नांदेड(प्रतिनिधी)-15 लाखांचा पकडलेला माल जप्त करून गुन्हा दाखल केला. पण त्यातील आरोपी पोलीस अंमलदाराने सोडून दिल्याचा अजब प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडला आहे. ही कार्यवाही तहसीलदारांनी केलेली आहे.
स्टेशन डायरी नोंद क्रमांक 6 प्रमाणे 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5.21 वाजता गुन्हा क्रमांक 599/2023 नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला. यामध्ये अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1995 चे कलम 3 आणि 7 जोडलेले आहे. प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे ट्रक क्रमांक एम.एच.40 बी.जी.6017 हा तहसीलदार नांदेड यांनी पकडला. त्यात 7 हजार 500 लिटर बायोडिझेल होते. त्यात जनरेटर जोडलेला होता. ट्रक आणि बायोडिझेलची किंमत हा ऐवज 15 लाख 32 हजार 500 रुपयांचा होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी नांदेड ग्रामीणच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार मलदोडे यांच्या ताब्यात देण्यात आला होता. काही लोक सांगतात की, त्यांनी तो पळवून लावला आहे. किंवा काही मोदके घेवून सोडून दिला आहे. सोबतच दर महा 200 मोदक या संदर्भाने मलदोडेच आणतात अशी माहिती प्राप्त झाली आहे. तहसीलदारांनी केलेल्या कार्यवाहीतील आरोपी सोडून देण्याचे धाडस किंबहुना पळवून लावल्याचे धाडस करणाऱ्या पोलीस अंमलदार मलदोडेचा आज स्वातंत्र्य दिनी सन्मान होणे आवश्यक आहे.
बायोडिझेलसह पकडलेला आरोपी नांदेड ग्रामीणच्या मलदोडेने सोडला म्हणे ; तहसीलदारंानी केली होती कार्यवाही