भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड(प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या शब्दात आजचे स्वातंत्र्य आम्हाला देणाऱ्या सर्व विरांना सलाम करून मी उपस्थितांना शुभकामना देत आहे असे सांगिेतले .
ध्वजमंचावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम पोलीस पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर राष्ट्रगित वाजवून पोलीस बॅन्ड पथकाने वातावरणात आनंद आणला. त्यानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे गित वाजवून पोलीस वाद्यवृंदाने आणखीनच रंगत आणली.
त्यानंतर राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांचा सन्मान करण्यात आला. सोबतच बेल्लारी येथे पुरात अडकेलेल्या एका बालकाला वाचविण्यासाठी आपला जिव धोक्यात घालणारे धर्माबादचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. अशाच प्रकारचे कार्य पुराच्यावेळी रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांनी केले होते. त्यांचाही सन्मान करण्यात आला.
यानंतर अनेक बालकांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेवून आमच्यासाठी केलेल्या कार्याला सलाम केला.






