
नांदेड(प्रतिनिधी)-इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीचे संचालक अजयकुमार बाहेती यांनी 3 ऑगस्ट रोजी रयत क्रांती संघटनेने केलेल्या आंदोलनाविषयी एक पत्र पोलीस अधिक्षकांना दिले असून आम्ही शेतकऱ्यांची परतफेड करणार आहोत. परंतू अशा आंदोलनांमुळे उद्योजग डबघाईला येतात असे या पत्रात लिहिले आहे.
इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी ग्रामीण भागाला ताकतवान करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांप्रमाणे सन 2011 पासून कृषी उद्योग करत आहेत. 50 एकर जागेच्या एकाच परिसरात 15 विविध अन्न प्रक्रिया युनिट आहेत. ही कंपनी राज्य सरकारने घोषीत केलेल्या मेगा प्रोजेक्टमध्ये आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त फुडपार्क आहेत. कंपनीने विभागातील 1000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि 1000 पेक्षा जास्त शेतकरी कंपनीशी थेट सलग्न आहेत.आमच्याविरुध्द जिवनावश्यक वस्तु कायदा आणि ईडीने खोटी कार्यवाही केली. त्यामुळे आमची बॅंक खाती एनपीएकडे वळवली गेली. कंपनीवर प्रशासक नेमण्यात आला. आम्हाला कंपनी वाचविण्यास व लढण्याची हिम्मत दिली.
शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेल्या सहकार्यामुळे व आमच्या प्रयत्नामुळे आम्ही महाराष्ट्र शासन यांच्याकडून 125 कोटी रुपयांचे अनुदान पत्र मिळविण्यात यशस्वी झालो आहोत. परंतू शासनाच्या निर्णयामुळे सर्व कंपन्यांचे व्यवहार नियमानुसार आणि अटीनुसार चालू ठेवायला पाहिजे म्हणून आमच्याकडे खेळते भांडवल शिल्लक नाही. मागील सहा-सात महिन्यात 1014 शेतकऱ्यांपैकी 305 शेतकऱ्यांना 16 कोटी 82 लाख 71 हजार 981 पैकी 30 लाख परत फेड केली आहे.
कंपनीवर सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे आम्हाला गुंवणूकदार शोधण्यास त्रास होत आहे.ईडीची कार्यवाही सुरू असल्यामुळे कोणीही कंपनीला मदत किंवा हस्तक्षेप करत नाही. पुढील सहा-सात महिन्यात शेतकऱ्यांचे सर्व पैसे आम्ही परत करू असा मला विश्र्वास आहे. 150 कोटी रुपये शेतकऱ्यांची थकबाकी बुडवली अशी खोटी माहिती प्रशासनाला व माध्यमांना देवून त्यांची दिशाभुल केली आहे. त्यामुळे कंपनीची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार आहे. पांडूरंग शिंदे यांनी आमच्याविरुध्द जाणून बुजून आंदोलन केले आणि ही बातमी मिडीयामध्ये फिरवणे सुरू आहे. प्रशासनाने सुध्दा 1014 शेतकऱ्यांनी किती तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याची माहिती द्यावी जेणे करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचाही पाठींबा आहे असे दिसेल. मी लवकरात लवकर शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी परिश्रम घेत आहे. झालेल्या आंदोलनाची सुध्दा सखोल चौकशी करावी जेणे करून शेतकऱ्यांचे हित जपले जावे अशी माझी विनंती आहे.