नांदेड(प्रतिनिधी)-दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या पिता आणि पुत्राला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सय्यद इमरान सय्यद उस्मान याने दवाखान्यातून दिलेल्या तक्रारीनुसार दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी ते आपल्या काही मित्रासोबत फेमस फंक्शन हॉलजवळ तंबोली हॉटेलमध्ये चहा पित असतांना तेथे ड्रायव्हर मेहबुब रसुल आला. त्याने माझ्याकडे असलेली थकबाकी 1 हजार रुपये मागितली. मी तुला नंतर देतो असे सांगितल्याने त्याने मला शिवीगाळ करून तो निघून गेला. पण त्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. पुन्हा 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास तांबोली हॉटेलमध्ये मी चहा पित असतांना ड्रायव्हर रसुलने मला मारहाण केली. त्यावेळी त्याचा मुलगा मुदसीक आला आणि त्याने माझ्या डोक्यात, पाठीत, इतर ठिकाणी खंजीरने सपा-सप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 251/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 323, 504, 506 आणि 34 नुसार दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला.
आज पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार अमोल भोकरे, मधुकर भिसे, हबीब चाऊस आणि माही दासरवाड यांनी पकडलेल्या शेख महेबुब शेख रसुल(48) धंदा ड्रायव्हर आणि त्याचा मुलगा शेख गाझी उर्फ मुदसिक शेख महेबुब (22) धंदा ट्रक डायव्हर रा.खुदबईनगर चौरस्ता नांदेड न्यायालयाने या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
जिवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी