मुखेड तालुक्यात भावाने भावाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-एका 50 वर्षीय व्यक्तीचा मौजे बेरळी (ब) ता.मुखेड शिवारात खून झाल्याचा प्रकार 6 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता उघडकीस आला.
अभिनंदन जयवंतराव जुने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलै ते 6 जुलैच्या रात्री त्यांचे वडील जयवंतराव गोविंदराव जुने हे रात्रीच्यावेळी आपल्या आखाड्यावर झोपले असतांना दिलीप गोविंदराव जुने या भावकीतील माणसाने शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरून जयवंतराव जुने यांच्या उजव्या डोक्यावरील कपाळावर दगडाने ठेचून त्यांचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, पोलीस निरिक्षक व्ही.व्ही. गोबाडे हे घटनास्थळी पोहचले. घडलेल्या प्रकारातील गुन्हेगारांला त्वरीत जेरबंद करू असा विश्र्वास व्यक्त केला . मारेकरी दिलीप गोविंदराव जुने याने आपलेच बंधू जयवंतराव गोविंदराव जुने यांचा खून केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *