नांदेड शहरात 16-17 ऑगस्ट रोजी रात्री पोलीसांनी राबवले कोम्बीग ऑपरेश

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानाला पोलीस विभागाने सुध्दा प्रतिसाद दिला असून एका आठवड्यात दुसऱ्यांदा कोम्बीग ऑपरेशन राबवून अनेक गुन्हेगार तपासले. काही जणांवर खटले दाखल केले. सोबतच अटकपात्र वॉरंट असलेल्या 9 जणांना ताब्यात घेतले.
नांदेड जिल्ह्यात आणि नांदेड शहरात वाढत चालेल्या गुन्हेगारीचे आव्हान पोलीसांनी सुध्दा स्विकारले आहे. त्यानुसार 16-17 ऑगस्टच्या रात्री पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपअधिक्षक सुरज गुरव आणि सुशीलकुमार नायक यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस अंमलदार, आरसीपी आणि क्युआरटीचे जवान यांनी पहाटे 5 वाजेपर्यंत कोम्बीग ऑपरेशन केले. या ऑपरेशनचे नेतृत्व अबिनाशकुमार यांनी केले.
या दरम्यान 133 आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 34 जणांना पोलीस ठाण्यात आणून सध्याच्या हालचालीविषयी आणि गुन्हेगारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 110/117 नुसार 65 केसेस केल्या. महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कलम 122 प्रमाणे 2 केसेस केल्या. भारतीय हत्यार कायद्यानुसार एक गुन्हा दाखल केला आणि तो आरोपी पकडला. अवैध वाळूच्या संदर्भाने दोन गुन्हे दाखल केले. तसेच अटक करण्याचे आणि जामीन देण्याचे 9 वॉरंट तामील केले. तसेच 19 जणांना समन्स तामील केले.
पोलीसांच्या या कारवाईमुळे रात्रीच्यावेळी फिरून गुन्हेगारी करणाऱ्या लोकांवर नक्कीच जरब बसेल अशी अपेक्षा आहे. हा प्रकार फक्त एक दोन वेळेसचा न राहता कायमचा व्हावा अशी अपेक्षा असली तरी पोलीसांकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता यामुळे ते अशक्य सुध्दा वाटते पण रात्रीच्या गस्तीत कार्यरत असणाऱ्या पोलीसांनी आपले काम 100 टक्के केले तरी सुध्दा गुन्हेगारीवर बराच आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *