मुलीने आपल्या वडीलांवर अंतिमक्रिया करून आपल्या जीवनाची जबाबदारी पुर्ण केली

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या वडीलांची अंतिमक्रिया करून एका युवतीने आपल्या जन्माचे पाण फेडले. या मयत व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा होता. मुलगा बोगस डॉक्टराच्या उपचारात मरण पावला होता.
बजरंग वानखेडे पाटील (अंदाजे 75 वर्ष) यांचे काल निधन झाले. आज सकाळी गोवर्धनघाट येथील शांतीदुत स्मशानभुमित त्यांच्यावर अंतिमक्रिया करण्याची प्रक्रिया त्यांची मुलगी कविता वानखेडे पाटील यांनी पुर्ण केली. बजरंग वानखेडे पाटील यांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा असे अपत्य होते.  त्यातील मुलाचा एका बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे मृत्यू झाला होता. त्या संदर्भाचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल आहे. तीन मुलींपैकी एक मुलगी प्राध्यापक असल्याची माहिती सांगण्यात आली. सर्वात मोठी मुलगी असलेल्या कविताने आपले वडील बजरंग वानखेडे पाटील यांच्यावर अंतिमक्रिया करून एक उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची अंतिमक्रिया मुलांमधील मोठ्या मुलाने करावी अशी प्रथा हजारो वर्षांपासून सुरू आहे. या प्रथेबद्दल वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या वेळी व्यक्त केले जातात. मात्र कविताने आपला भाऊ नाही. आम्ही बहिणी सुध्दा आमच्या वडीलांचीच मुले आहोत या भावनेतुन सर्वात मोठी बहिण असलेल्या कविताने आपल्या वडीलांची अंतिमक्रिया पुर्ण केली.
यामुळे मुलगा पाहिजेच असा हट्ट केला जातो. बजरंग वानखेडे पाटील यांच्याकडे मुलगा असल्यानंतर सुध्दा तो दुर्देवाने गेला होता. त्याची जागा भरून काढत कविताने आपल्या वडीलांवर केलेली अंतिमक्रिया ही समाजासाठी एक उदाहरण आहे.

संबंधित व्हिडिओ…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *