गोदावरी नदीत अनोळखी 40-45 वर्ष वय असलेल्या महिलेचे प्रेत सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्याकडे वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात आज दुपारी 40- 45 वर्ष वयाच्या एका अनोळखी महिलेचे प्रेत गोदावरी जिवरक्षक दलाने बाहेर काढले आहे. नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या महिलेस कोणी ओळखत असेल तर त्यांनी लवकरात लवकर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या बाबतची माहिती द्यावी जेणे करून या महिलेच्या नातलगांचा शोध लावता येईल.
आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास जुना मोंढा भागातील शनि मंदिराजवळच्या पुलाखाली गोदावरी नदीपात्रात एका महिलेचे प्रेत तरंगतांना दिसल्यानंतर गोदावरी जिवरक्षक दलाच्या सदस्यांनी ते प्रेत बाहेर काढले. या महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लॉज दिसतो आहे. या महिलेचे वय अंदाजे 40-45 असेल. नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत महिलेस कोणी ओळखत असेल तर त्याबाबत लवकरात लवकर नांदेड ग्रामीण पोलीसांना माहिती द्यावी ज्यावरुन त्या महिलेच्या नातलगांची ओळख पटविण्यासाठी मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *