नांदेड(प्रतिनिधी)-सदाशिव देशमुखला ठार मारले या संदर्भाची चर्चा करून तीन जणांनी एका 23 वर्षीय युवकावर कंधारच्या खिचडी हॉटेलसमोर जिवघेणा हल्ला केल्याचा प्रकार 20 ऑगस्ट रोजी दुपारी घडला आहे.
शुभम राजूसिंह सुर्यवंशी (23) रा.समर्थनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.20 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजेच्यासुमारास विद्युतनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कंधारची खिचडी हॉटेलसमोर अजितसिंह चव्हाण (24), गणेश शिंदे(22) आणि शिवा पाटील (24) या तिघांनी त्यांना अडवले. तुझ्या चुलत भावाने आमचा मित्र सदाशिव देशमुख यास ठार मारले. त्यावेळी तु आणि तुझा भाऊ साईसिंह याने मदत केली असे सांगून या तिघांनी धार-धार शस्त्राने शुभम सुर्यवंशी याच्या शरीरावर अनेक जागी वार करून त्याला जिवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला.
घटना घडताच पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शुभम सुर्यवंशीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 323, 324, 323, 504, 506 आणि 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 जोडून गुन्हा क्रमांक 291/2023 दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दोनकलवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
सदाशिव देशमुखच्या खूनाची आठवण करून एका युवकावर तिघांनी केला जीवघेणा हल्ला