नांदेड(प्रतिनिधी)-श्री. गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी मोफत “असाध्य आजार वेदना-मुक्ती तपासणी उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातील बहुप्रचलीत पण, असाध्य व जुनाट आजारांवर यथोचित उपचार नितांत गरजू रुग्णांना यांचा फायदा व्हावा या हेतूने या विनाशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्या शिबिरामध्ये १५२ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर तात्काळ सुयोग्य उपचार करण्यात आले.
या शिबिरात मान दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी, टाच दुखी, गुडघे दुखी, संधिवात, मणक्याचे आजार, त्वचेचे आजार, खांदे दुखी, डोके दुखी, गाठीचे आजार, स्नायूंचे आजार यावर उपचार करण्यात आले.
सदरचे शिबीर डॉ. हादि अन्सारी व डॉ. मुनासीर खान यांच्या मार्गदर्शनाखाली, निशुल्क तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. सदरच्या उपक्रमास जनतेचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता अशा प्रकारची जनताभिमुख शिबिरे आणि जनहितार्थ आरोग्यविषयक उपक्रम वरचेवर राबविण्याचा श्री गुरुजी रुग्णालय व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे आणि या शिबिरास दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्व शिबिरार्थ्याप्रति ऋणनिर्देश अभिव्यक्त केले आहे.
