1 लाख 87 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे एक जबरी चोरी झाली आहे. त्यात महिलेचे मंगळसुत्र तोडण्यात आले आहे. इतवारा हद्दीत एक दुकान फोडण्यात आले आहे आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
सुवर्णाबाई मनोज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जुलै रोजी रात्री 8.45 ते 8.55 या 10 मिनिटाच्या वेळेत त्या त्यांचे पती आणि बालके हे जेवन केल्यानंतर बाहेर फिरत असतांना त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका मोटारसायकलवरील स्वाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र 19 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहे. तामसा पोलीसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 392 नुसार हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक घुगे अधिक तपास करीत आहेत.
मुंजाजी परोजी लहाने यांची ऑनलाईन सर्व्हीस दुकान जिल्हा परिषद शाळेजवळच्या व्यापारी संकुलात आहे. 6 जुलैच्या रात्री 8.30 ते 7 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या दुकानाचे शर्ट तोडून कोणी तरी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, एलसीडी मॉनिटर आणि 2 हजार रुपये रोख रक्कम असा 6 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंडसंहितेच्या कलम 457 आणि 480 नुसार दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार राठोड हे करीत आहेत.
शुभम अवधूतराव परतवाड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.12 आर.व्ही. 6906 ही गाडी 2 जुलै च्या रात्री 10 ते 3 जुलैच्या पहाटे 7.30 वाजेदरम्यान शिवरामनगर नांदेड येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 50 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार कंधारे हे करीत आहेत.
शाहुनगर नांदेड येथून 29 जून 2021 रोजी विकास दिलीप ढोक यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.29 बी.के.5544 ही चोरीला गेली या गाडीची किंमत 55 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
एक जबरी चोरी, एक दुकान फोडले, दोन दुचाकी चोरी