नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व जय क्रांती कॉलेज लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लॉन टेनिस(मुले) या खेळ प्रकारात नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने विजेते पद प्राप्त केले आहे.
23 ऑगस्ट रोजी या स्पर्धा लातूरमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात यशवंत महाविद्यालयाच्या संघाने नांदेडच्या एसजीजीएस आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाचा 3-1 असा पराभव करून स्पर्धेचे विजेते पद प्राप्त केले.
विजयी संघातील खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. कर्णधार अमरनाथ कापुसकरी,प्रकाश खरबे, यश दमकोंडवार आणि अमित गट्टाणी यांनी परिश्रम घेवून स्पर्धेचे विजेते पद मिळवले. या विजेत्या संघास क्रिडा संचालक डॉ.मनोज पैंजणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे, डॉ.हरीशचंद्र पतंगे व उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले आहे.
आंतर महाविद्यालयीन टेनीस स्पर्धेत यशवंत महाविद्यालयाला विजेते पद