नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे श्री.108 डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे 16 वे श्रावण मास पुजा तपोअनुष्ठाण श्री.भिमाशंकर ज्योर्तिलिंग येथे सुरू झाले आहे. या अनुष्ठाणाची सांगता 7 सप्टेंबर रोजी होणार आहे.
भारतातील 12 ज्योर्तिलिंगापैकी एक असणाऱ्या भिमाशंकर ज्योर्तिलिंग ही भगवान शिवांची पवित्र तिर्थक्षेत्र आहेत. असे मानले जाते की, भगवान शिव यांनी स्वत: या संस्थांना भेट दिली होती आणि म्हणून त्यांचे भक्तांच्या हृदयात विशेष स्थान आहे.भिमाशंकर मंदिर हे विश्र्वकर्मा शिल्पकारांच्या कौशल्यांचा दाखला आहे. हे 13 व्या शतकाच्या आसपास मंदिर बांधण्यात आल आहे. या ठिकाणची दंतकथाही आहे. महाशिवरात्र आणि श्रावण महिना या कालावधीत मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी हजेरी लावतात. या दिवसांत फळप्राप्ती होत असती अशी अख्यायीकाही आहे. अशा या पवित्र ठिकाणी गणाचार्या मठसंस्थानचे मठाधिपती श्री.ष.ब्र.108 डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचे 16 वे श्रावण मास तपोअनुष्ठाण सोहळा दि. 17 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. यामध्ये सकाळी 5 ते 6 एकांत जप, 6 ते 8 इष्ठलिंग रुद्राभिषेक, दुपारी 1 ते 2 मध्यन पुजा, सायंकाळी 7 ते 8 मध्यन पुजा असा दैनंदिन कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला नांदेडसह पुणे व इतरही ठिकाणावरून भक्तगण दररोज हजारोच्या संख्येने हजेरी लावत आहेत. या तपोअनुष्ठाण सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त भक्त मंडळी गणाचार्य मठ मुखेड यांनी केले आहे.
श्री.विरुपाक्ष शिवाचार्य मुखेडकर यांचे भिमाशंकर ज्योर्तिलिंग येथे तपोअनुष्ठांण