नांदेड(प्रतिनिधी)-दि.30 मे 2023 रोजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्यांनुसार त्या पोलीस अंमलदारांना अद्याप बदल्यांवर सोडण्यात आले नाही. यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्वरीत बदल्यांवर सोडण्याचे आदेश बिनतारी संदेशाद्वारे पुन्हा एकदा दिले आहेेत.
सन 2023 च्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस अंमलदारांना नवीन बदल्या दिल्या होत्या. त्या बदल्या झाल्यानंतर सुध्दा पोलीस अंमलदारांना प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या काही छुप्या सवलतींसाठी त्या पोलीस अंमलदारांना नवीन बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त केले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बिनतारी संदेश क्रमांक 2587/2023 दि.24 ऑगस्ट 2023 नुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहितीस्तव पाठवून बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांना त्वरीत नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशात दि.25 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करून तसा अहवाल आज दि.26 ऑगस्ट पर्यंत पोलीस अधिक्षक कार्यालयात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. आज 26 ऑगस्टचा सुर्यास्त झाला आहे. पण बदल्या झालेल्या किती पोलीस अंमलदारांना प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले आहे की नाही याची माहिती स्पष्टपणे प्राप्त झाली नाही.
यापुर्वी सुध्दा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कसुरी अहवालावरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील काही पोलीस अंमलदारांना पोलीस मुख्यालयात सलग्न करण्याचे आदेश जारी केले होते. त्यासंदर्भाने सुध्दा अद्याप पोलीस मुख्यालयात सलग्न झालेल्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आदेश