क्षुल्लक कारणावरुन जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार ऊर्साच्या बॅनरमध्ये माझा फोटो का लावला नाही असा सांगून चार जणांनी एका 24 वर्षीय युवकला बिजली हनुमानमंदिर उस्माननगर रोड येथे जिवघेणा हल्ला केला. हा प्रकार 26 ऑगस्टच्या रात्री 11.30 वाजता घडला.
तोहसीफ शेरअली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास तो आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.जी.8262 वर बसून कंधार ऊर्साला जाऊन परत येत असतांना त्याच्या मागून आलेल्या कारने त्याच्या दुचाकीला कट मारली आणि गाडीतून उतरलेल्या शाहरुख, सोहेल, अरबाज आणि विलायत सर्व रा.शिवाजीनगर नांदेड यांनी त्याच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्यात तोहसफ शेरअलीच्या पोटात, डाव्या दंडावर, डाव्या बरगडीत, छातीवर उजव्या बाजूला असे अनेक वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गाडवे, पोलीस उपनिरिक्षक जामोदकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तोहसीफ तक्रारीवरुन शाहरुख, सोहेल, अरबाज आणि विलायत या चौघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 , 34 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 629/2023 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सचिन गाढवे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *