नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालयात आज 28 ऑगस्ट रोजी ऍड.महम्मद अब्बास महम्मद हैदर यांनी आपल्या बदलीनंतर कार्यभार स्विकारला आहे.
मुळचे नांदेडचे राहणारे ऍड.महम्मद अब्बास महम्मद हैदर यांनी सन 2000 मध्ये आपले विधी शिक्षण पुर्ण केले. नांदेडमध्ये काम करत त्यांनी सरकारी वकील या पदाची परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिली आणि सन 2009 मध्ये ते सरकारी वकील झाले. सर्वात प्रथम नियुक्ती जळगाव, त्यानंतर वसमत, परभणी, अहमदपुर आणि आता नांदेड येथे त्यांची बदली झालेली आहे.
आज 28 ऑगस्ट रोजी ऍड. महम्मद अब्बास महम्मद हैदर यांनी नांदेड जिल्हा सरकारी अभियोक्ता कार्यालयात आपला अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदाचा पदभार सांभाळला आहे. नांदेडमधील वकील मंडळींनी ऍड.महम्मद अब्बास महम्मद हैदर यांना नवीन जबाबदारीसाठी शुभकामना दिल्या आहेत.
नांदेडमध्ये नुतन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड.महम्मद अब्बास रुजू