नांदेड(प्रतिनिधी)-20 हजारांची लाच स्विकारणाऱ्या मनपातील गिरीश काठीकरच्या मदतीला ऍड.मनिष रामेश्र्वर खांडील (शर्मा) आज आले आणि गिरीश काठीकरला भोवळ आली. हा कायद्याचा खेळ सुध्दा असू शकतो. पण सध्या न्यायालयाने गिरीश काठीकरला जामीन नाकारला आहे. आणि भोवळ आल्यामुळे सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका फिर्यादीचे बेकायदेशीर घर पाडण्याची भिती दाखवून मालमत्ता कर विभागातील लिपीक आणि क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजिराबादचा अतिरिक्त कार्यभार असलेले गिरीश चिंताहरी काठीकर यांनी त्या तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची तयारी नसल्याने तक्रारदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेला आणि 2 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या आसपास गिरीश चिंताहरी काठीकर (52) याने लाचेची रक्कम मिर्झा अबजल बेग शमशोद्दीन बेग (54) यांच्याकडे देण्यास सांगितले.
लाचेची रक्कम मिर्झा बेगने स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्या दोघांना जेरबंद केले. 3 सप्टेंबर रोजी विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी महानगरपालिकेमध्ये नामांकित असलेले गिरिश चिंताहरी काठीकर आणि मिर्झा अफजल बेग शमशोद्दीन बेग या दोघांना आज 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले.
संबंधित व्हिडिओ…
काल दि.3 सप्टेंबर रोजी न्यायालयात जवळपास सर्व महानगरपालिका गिरीश काठीकरसारख्या कर्तव्यदक्ष माणसाच्या बचावासाठी अवतरली होती. गिरीश काठीकर यांच्यावर या पुर्वी सुध्दा लाच लुचपत प्रतिबंधक प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता अशी चर्चा आज न्यायालयात सुरू होती. मात्र या चर्चेला कोणीही दुजोरा देत नव्हते. आज गिरीश काठीकर यांच्या कायदेशीर मदतीसाठी दुसऱ्या पिडीतील विद्वान वकील ऍड. मनिष रामेश्र्वर खांडील (शर्मा) यांचे पदार्पण झाले. यांचे पर्दापण होताच न्यायालयांनी गिरीश काठीकर आणि मिर्झा अफज बेग या दोघांची रवागनी तुरूंगात केली. तुरूंगाची ऑर्डर ऐकताच गिरीश काठीकरला भोवळ आली. त्यामुळे त्यांना नंतर दवाखान्यात भर्ती करावे लागले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलेल्या वेळेप्रमाणे त्यांनी गिरीश काठीकरकडे असलेल्या बेनामी संपत्तीची चौकशीची केली असेल तर त्यांच्या किती कंत्राटदारांसोबत भागिदाऱ्या आहेत आणि त्यांच्या संपत्ती कोठे-कोठे आहे हे कळले असते. परंतू प्रत्यक्षात काय झाले याची माहिती आज तरी प्राप्त झाली नाही.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2023/09/03/20-हजारांची-लाच-स्विकारणाऱ/
One thought on “ऍड. मनिष शर्मा यांच्या पर्दापणानंतर लाचखोर गिरीश काठीकर तुरूंगात”