नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक म्हटल की, जय-पराजय हा निश्चितच असतो मात्र विजय मिळवला म्हणून आनंदीत व्हायच नाही पराजित झाल म्हणून दु:ख वाटून घ्यायच नाही. मैदानात जो शेवटपर्यंत लढतो तो शेवटी विजयीच ठरतो. पण कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बाबतीत मात्र काहीस वेगळच पाहायला मिळाल. कंधार-लोहा म्हणजे माझा बालेकिल्ला अशा भ्रमात राहणाऱ्या आणि एकतर्फी निवडणुक जिंकतो म्हणाऱ्या स्वयंघोषित वाघाला नवख्या राजकीय नेत्याने पावसाळ्यातही घाम फोडला अस बाजार समितीच्या निकालानंतर अख्या जिल्ह्यात चर्चा रंगली होती.
कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक खा.प्रताप पाटील चिखलीकर आणि आ.शामसुंदर शिंदे या दोघांच्या प्रवेशाने ही निवडणुक संबंध राज्यभर गाजली. कोणाचा विजय होणारअ ाणि कोणाचा पराभव होणार याची चर्चा मात्र दि.4 रोज सोमवारच्या निकालापर्यंत प्रत्येकाला याची उत्स्कुता लागली होती. विशेषता: दि.4 रोजी सोमवारी सबंधं राज्यभर मराठा समाजाने लाठीचार्जच्या निषेधार्थ मोर्चे काढले होते आणि बंदही पुकारला होता. मात्र अनेकांचे लक्ष कंधारच्या निकालाकडे होते. मागील 40 वर्षापासून राजकारणा सक्रीय असणाऱ्या चिखलीकर कुटूंबियांना अवघ्या चार वर्षात राजकारणात प्रवेश करून लोहा-कंधार मतदार संघाचे आमदार झालेल्या शामसुंदर शिंदे यांनी मात्र चांगलेच आसमान दाखवले. अनेकांनी दाजी आणि भावजी ऐनवेळी एकच होवू शकतात अशी चर्चा होती मात्र या निवडणुकीच्या निकालाने या चर्चेला निश्चितच पुर्णविराम मिळाला असावा अशी आशा आता मतदार करीत आहेत. या निवडणुकीत खऱ्या अर्थाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आ.शामसुंदर शिंदे या दोघांनाही सम-समान म्हणजे पाच उमेदवार या निवडणुकीत निवडूण आणता आले. यात भाजप, राष्ट्रवादी कॉंगे्रस आणि शिवसेना (शिंदे गट) अशी युवती होती. तर शेकाप आणि कॉंग्रेस अशी आघाडी यामध्ये खा.चिखलीकर गटाचे 5 उमेदवार, आ. तुषार राठोड यांचे 3, राष्ट्रवादी कॉंगे्रस 1 आणि शिवसेना(शिंदे गट) 1, आ.शामसुंदर शिंदे यांचे 5, कॉंग्रेस 2 आणि भारत राष्ट्र समिती 1 अशा प्रकारे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये खा.चिखलीकर गटाला 6 हजार 467 मते तर आ.शिंदे यांच्या गटाला 6 हजार 372 मते मिळाले आहेत. यामध्ये केवळ 95 मतांचा फरक आहे. ज्या व्यक्तीने या मतदार संघाची दोन वेळा आमदारकी, विद्यमान खासदार, जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषद सभापती, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आणि कलंबर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यासह अनेक राजकीय पदे उपभोगणाऱ्या खा.चिखलीकरांना मात्र केवळ 95 मते अधिकचे घेता आले. आम्ही एकतर्फी निवडणुक जिंकू. कंधार-लोहा हा आमचा बालकिल्ल आहे. असे म्हणणाऱ्या स्वयंघोषित वाघाला नवख्या राजकीय नेत्याने किंवा राजकारणाचा कोणताही गंद नसणाऱ्या आ.शामसुंदर शिंदे यांनी पावसाळ्यातही घाम फोडला.एकंदरीत पैशांच्या जोरावर आम्ही निवडणूका जिंकू शकतो. निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर मतदारांना कोठे तरी बाहेर घेवून जाणे, मतदानाच्या दिवशी दुपारी 1 च्या नंतर जे मतदार मतदान केले नाहीत. अशांना शोधून त्यांचा खिसा भरणे असे अनेक हातखंडे वापरूनही एक रुपयांचे उत्पन्न नसणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूकीत मतदारांनी जागा दाखवली. अशी चर्चा संबंध जिल्हाभर निकालाच्या दिवशी सुरू होती.
नवख्या आमदारांनी मुरब्बी खासदारांना घाम फोडला