बीएलओ यांच्या निलंबनाचे प्रस्ताव सादर करा-जिल्हाधिकारी

नांदेड(प्रतिनिधी)-भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार मतदार यादी पुर्नरनिरक्षणाचे काम राज्यात सध्या सुरू आहे. याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही सर्व विधानसभा मतदार संघात यादी पुर्नरनिरक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र यात काही बीएलओ यांच्याडून असमाधानकारक काम तर काही जणांनी अद्यापही कामाची सुरूवात केली नाही अशांच्या निलंबनाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी दिले आहेत.

भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार राज्यामध्ये मतदान यादीच्या पुर्नरनिरक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी बीएलओचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्ह्यातील बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक यांची सर्व पदे भरण्यात आली आहेत. राज्याच्या इतर तुलनेत नांदेड जिल्ह्याचे काम समाधानकारक दिसून येत नाही अशी बाब वरिष्ठ कार्यालयाकडून खैद व्यक्त करण्यात आला आहे. याची दखल घेवून जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात बीएलओ यांना वारंवार सुचना देवूनही या गोष्टीचे त्यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. जिल्ह्यातील एच-2 एच-2 सर्वेक्षण, मयत मतदारांची वगळणी, नवीन मतदारांची नोंदणी यासह इतर कामातही समाधानकारक प्रगती झालेली नाही. तसेच मुखेड तालुक्यातील काही बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक यांनी अद्यापही मतदार यादी पुर्नरनिरक्षण कामाला सुरूवात केली नाही ही अत्यंत खैदजणक बाब आहे.

जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी अशा बीएलओंच्या कामाचा आढावा घेवून अद्यापही ज्या बीएलओने कामांची सुरूवात केली नाही व ज्यांचे असमाधानकारक काम आहे त्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दि.6 सप्टेंबर रोजी आदेश काढून निलंबनाचे प्रस्ताव मागविले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील असमाधानकारक असणारे बीएलओ व बीएलओ पर्यवेक्षक यांची संख्या किती असू शकते हे मात्र आता प्रस्ताव सादर केल्यानंतरच कळू शकेल. या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीने बीएलओ शिक्षकांत आता एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *