नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षकांनो शिक्षण संस्थेत नोकरी करतांना संस्था चालकांना खुश ठेवा म्हणजे पुढे कधी तरी आमदार सुध्दा होता येईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शब्दात तर संतोष पांडागळे हे एक उत्तम शिक्षक आहेत, उत्तम पत्रकार आहेत, चांगले वक्ते आहेत, सामाजिक संवेदना त्यांना कळते आणि भविष्यात त्यांची पत्रकारीता अजून बहरावी अशा शुभकामना त्यांनी दिल्या आहेत.
आज नांदेड जिल्ह्यातील अत्यंत नामवंत, आष्टपैलू व्यक्तीमत्वाचा संतोष पांडागळे यांचा जन्मदिन आहे. आपल्या शिराढोण गावातून बाहेर निघाल्यानंतर शिराढोणशी त्यांनी किती सामाजिक जाणीव ठेवली याचाा शोध पुढे घ्यावा लागेल. कार्यकारी संपादक हे पद प्राप्तकरतांना अशोक चव्हाणांसमोर सुध्दा असाच एक किस्सा घडला होता की, त्यांना एका पत्रकाराने सांगितले की, संतोष असे म्हणत होता साहेब की, त्या अलाण्या-फलाण्याने एक बातमी लिहिली आणि त्यासाठी कॉंग्रेसने त्याला हैद्राबादला पाठविण्याची सोय केली. तरी पण अशोकरावांनी त्याला सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक बनवले.
अशोक चव्हाण हे एक मोठे वटवृक्ष आहे, पण परवा त्यांना दहा हजार रुपये देण्याची व्हायरल झालेली ऑडीओ मात्र त्यांच्या या आष्टपैलू व्यक्तीमत्वाला सुरूंग लावतच आहे. अशोक चव्हाणांच्या वटवृक्षाखाली छोटी मोठी तणे अनेक वाढली आहेत. काहींनी त्यानंतर गद्दारीपण केली आहे. त्या गद्दारीमध्ये यांचे नाव येण्याची शक्यता कमी आहे की, ते अशोक चव्हाणांच्या संस्थेवर शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात 95 टक्के शिक्षकांना पत्रकारच व्हावे वाटते. त्याचे कारणही आहे. कोठे ही बाहेर गेल्यावर मी शिक्षक आहे हे सांगायला लाज वाटते परंतू मी पत्रकार आहे हे सांगण्यात जो मोठेपणा मिळतो त्यामुळेच संतोष पांडगळेने तो मार्ग अवलंबला आणि त्याला भरपूर उन्नतीदर्शक मार्गांकडे नेले.
कोणाच्या उन्नतीमुळे आमचे काही दुखण्याचे कारण नाही. आम्ही तर आज त्यांना जन्मदिनाच्या शुभकामना देतांना पुन्हा कधी ऑडीओचा काळीमा तुमच्या माथी लागू नये याची दक्षता घ्या असेच म्हणत आहोत. काही पत्रकारांनी आज विशेष पुरवण्या काढल्या आहेत. पुरवण्या कशा निघतात, कशा काढल्या जातात, त्यासाठी काय-काय लागते हे पुन्हा लिहुन आम्ही संतोष पांडागळेची आणि त्या व्यवसायीक पत्रकारांची खिल्ली उडवू इच्छीत नाही. हे सर्व लिहितांना आम्हाला नेहमीच 50 च्या दशकातील पत्रकार, विचारवंत, लेखक ज्यांनी आपल्या पत्रकारीतेसाठी तुरूंगवास भोगला त्यांची आठवण होत राहते. त्यांचे नाव आम्ही खूपवेळेस लिहिले आहे तरी आजही लिहिण्याची इच्छा आहेच. त्या सदगृहस्थांचे नाव स.आदत हसन मन्टो असे आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांचे वडील उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती होते तरीपण त्यांना तुरूंगात जावे लागले होते. त्याचे कारण त्यांची लेखणी होती आणि अशीच निर्भिड लेखणी संतोष पांडागळेची आहे अशा तारीफ करणाऱ्या त्या पत्रकाराची तारीफ करतांना आम्हाला सुध्दा लाज वाटते आहे.
शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांनी संस्था चालकांना खुश ठेवावे संधी मिळेल आमदारकीची