नांदेड(प्रतिनिधी)-तिरुपतीनगर धनेगाव येथे आपले घर बंद करून कुटूंबिय मुलाकडे नांदेडला गेले असतांना त्यांचे बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 62 हजार 770 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
शंकरराव माणिकराव केळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता त्यांनी आपले घर बंद करून आपल्या मुलाकडे नांदेडला गेले. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लॉकर तोडून त्यातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 62 हजार 770 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मठवाड अधिक तपास करीत आहेत.
धनेगाव येथे 1 लाख 64 हजारांची चोरी