नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे विभागात काम करणाऱ्या दोन जणांवर सीबीआयने धाड टाकली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यातील एक कार्यालय नांदेड शहरातील फलाट क्रमांक 4 वर वरिष्ठ अनुभाग अभियंता (विद्युत अनुरक्षण) हे आहे. या विभागाचे प्रमुख अगोदर कनिष्ठ अभियंता होते आणि आता वरिष्ठ अभियंता विद्युत विभाग शिवय्या एम.हे आहेत. याबाबत सीबीआय पथकाला माहिती विचारली असता ते आज काही सांगायला तयार नाहीत. आम्ही उद्या न्यायालयात सर्व काही सादर करू असे सांगत आहेत.
आज सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास नांदेड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वरील वरिष्ठ अनुभाग अभियंता (विद्युत अनुरक्षण) या कार्यालयात प्रवेश केला आणि सर्वप्रथम दारे बंद करून घेतली. या विभागाचे प्रमुख शिवय्या एम. हे आहेत. प्राप्त माहितीनुसार शिवय्या एम हे बऱ्याच वर्षापासून नांदेड रेल्वे विभागात कार्यरत आहेत. अगोदर ते कनिष्ठ अभियंता होते. पुढे त्यांना पदोन्नती मिळून ते वरिष्ठ अभियंता झाले आहेत. शिवय्या एम. यांच्याविरुध्द काय तक्रार आहे हे जाणून घेण्यासाठी सीबीआय पथकाची संपर्क साधला असता त्यांनी आज काहीही सांगण्यास नकार दिला. उद्या आम्ही आमचे सर्व सादरीकरण न्यायालयात करू. तुम्ही ते पाहा असे सांगितले.
या सोबतही खात्रीलायक माहितीनुसार रेल्वे पुर्णा येथील कार्यालयात काम करणाऱ्या दुसऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्यावर सुध्दा सीबीआय पथकाने धाड टाकल्याची माहिती आहे. त्यांच्या नावाबद्दल माहिती आम्हाला आहे. पण प्रशासनिक स्तरावर या बाबत कोणी दुजारा देत नाही. म्हणून आम्ही ते नाव बातमीत लिहिलेले नाही.
केंद्र सरकारचा रेल्वे विभाग एकाअर्थी श्रीमंत विभाग समजला जातो. पण आज आम्ही रेल्वे विभागाच्या फलाटावर जाण्यासाठी पायऱ्या चढतो तेंव्हा त्या पायऱ्यांची परिस्थितीत अत्यंत वाईट अवस्थेत आहे. तसेच स्वयंमचलित पायऱ्या कधी सुरू असतात तर कधी बंद असतात त्याचाही काही नेम नाही. रेल्वे विभागातून आपले साहित्य दुसरीकडे पाठवतांन रेल्वेच्या पावती पेक्षा जास्त रक्कम गुत्तेदार घेतात. नांदेड विभागाच्या महाप्रबंधक सध्या निती सरकार आहेत. त्यांच्या कामाची ख्याती ऐकली तेंव्हा त्यांच्याकडे सत्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे सांगितले जाते. तरी पण आज सीबीआय विभागाने नांदेड आणि पुर्णा येथे टाकलेले छापे म्हणजे कोठे तरी दाळ काळी आहेच.
रेल्वे विभागाचे वरिष्ठ विद्युत अभियंता अडकलेले सीबीआयच्या जाळ्यात