संजय बियाणीचा खून करणाऱ्या रंगाने पहिला खून वयाच्या 19 व्या वर्षी केला होता

नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणीचा खून करणाऱ्या दोन पैकी एकाला नांदेडलज्ञा आणल्यानंतर सध्या तो दहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत आहे. संजय बियाणी अगोदर त्याने तीन खून केलेले आहेत. तसेच एक रॉकेट हल्ला केलेला आहे.हा खूनाचा प्रकार एवढा मोठा होईल असे या गुन्हेगाराला वाटत नाही. यावरून गुन्हेगारीची पाळेमुळे या युवकावर किती जोरदारपणे पेरली गेली आहेत हे दिसते.
दिपक उर्फ दिपुना उर्फ सुनिल सुरेशकुमार रंगा (23) रा.सुरखपुर ता.जि.झज्जर राज्य हरियाणा या युवकाला हस्तांतरण वॉरंटवर नांदेड पोलीसांनी संजय बियाणीच्या खून प्रकरणात नांदेडला आणल्यानंतर त्याला काल न्यायालयाने दहा दिवसांपासून पोलीस कोठडीत पाठविले. आज या युवकाचे वय 23 वर्ष आहे. सन 2019 मध्ये या दिपक उर्फ दिपुनाने चंदीगड येथे दवाखान्यात एका व्यक्तीचा खून केला. त्यावेळेस त्याचे वय फक्त 19 वर्ष होते. त्यानंतर सन 2020 मध्ये पंजाब राज्यात एक डब्बल मर्डर केला. म्हणजे त्यात दोन लोक मारले गेले. त्यानंतर 2022 मध्ये संजय बियाणीचा खून केला. त्यानंतर 2022 मध्येच पंजाब राज्यातील गुप्तचर विभागाच्या कार्यालयावर रॉकेट हल्ला केला. सन 2019 ते 2023 या चार वर्षात या युवकाने चार खून एक रॉकेट हल्ला करून तो देशाच्या रडारवर आला आणि त्याला युपीए कायदा लागला.
हा युवक अगोदर लॉरेन्स बिष्णोई या गॅंगस्टरच्या संपर्कात होतो.पुढे तो हरविंदरसिघ उर्फ रिंदाच्या नादाला लागला. याच्यासोबतचा दुसरा मारेकरी साथीदार आजही अल्पवयीन आहे. त्याबाबत अद्याप त्याची तपासणी सुरू आहे की, त्यावर कोणत्या कायद्यानुसार खटला चालेल. प्राप्त झालेल्या मारेकऱ्यांना अत्यंत भावनीक पध्दतीने आमच्यावर कसा अन्याय होत आहे आणि आम्ही काही अन्याय करत नसून आम्ही फक्त आमच्यावर झालेल्या अन्यायाला हिंसक पध्दतीने विरोध करीत आहोत आणि हे अक्कल नसलेले युवक या जाळ्यात फसले आणि गुन्हेगार झाले. अशा पध्दतीचा हा रंगा सध्या नांदेडच्या पोलीस कोठडीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *