नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस अंमलदाराचे आज पहाटे 7 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
नियंत्रण कक्षात नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक किशन तेलंग यांना आज सकाळी 7 वाजता स्नेहनगर पोलीस कॉलनीमधील लोणावळा इमारतीतील त्यांच्या घरात हृदयविकाराचा झटका आला.त्यांना त्वरीत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. परंतू दवाखान्यात पोहचण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. किशन तेलंग यांचे मुळ गाव सांगवी (बेनक) ता.मुखेड हे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांची अंतिमयात्रा स्नेहनगर कॉलनीतील त्यांच्या घरापासून सायंकाळी 4 वाजता निघेल आणि शांतीधाम स्मशानभुमी गोवर्धनघाट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवृत्ती यांनी दिली.वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा तेलंग कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक किशन तेलंग यांचे निधन; सायंकाळी अंतिमसंस्कार