नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या वसाहतीत परवांगीच्या विसंगत बांधकाम होत असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस शंकर नागोराव सोनटक्के यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिली आहे.
वास्तव न्युज लाईव्ह पत्रकारांबाबत अनेकदा लिखाण करते. त्यांचे पितळ उघडे पाडते तरीपण बेघर पत्रकारांना त्या संदर्भाने काही लाज कधीच वाटली नाही. आपण प्रशासनाला मुर्ख बनवून फुकट लाटलेल्या जमीनीत भुखंड बनवून त्यातून कोट्यावधी रुपये कमवले यातच बेघर पत्रकार खूश असतात आणि आमचे काय वाकडे झाले असे वागत असतात.परवा दि.11 सप्टेंबर रोजी भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस शंकर नागोराव सोनटक्के वानेगावकर यांनी जिल्हाधिकारी नांदेड आणि महानगरपालिका आयुक्त नांदेड यांना एक निवेदन दिले असून शासकीय अधिकारी असलेल्या व्यक्तीने स्वत:ला पत्रकार असल्याचे दाखवून भुखंड लाटल्याची तक्रार केली आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नांदेड येथे कापुस संशोधन केंद्र देगलूर नाका येथे कार्यरत असलेले कृषी संशोधन अधिकारी पवन कृष्णराव ठोके यांनी आपण पत्रकार असल्याचे दाखवून बेघर पत्रकारांच्या सोसायटीत अत्यंत भिकारी परिस्थितीत असलेल्या एका बेघर पत्रकाराचा भुखंड खरेदी केला आणि त्यावर गगनचुंबी इमारत बांधण्याचे काम चालू आहे. एक शासकीय अधिकारी पत्रकार कसा असू शकतो असा प्रश्न आपल्या निवेदनात शंकर सोनटक्के यांनी विचारला आहे.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शंकर सोनटक्के सांगतात हा भुखंड क्रमांक 20 पवन कृष्णराव ठोकेचा आहे. महानगरपालिकेने मंजुर केलेल्या लेआऊटपेक्षा विसंगत पध्दतीने येथे काम सुरू आहे. शेजारीच विमानतळ आहे. उंचीच्या मर्यादांना मुठमाती देवून येथे 3 मजली इमारतीचे काम चालू आहे. सोबत चटई क्षेत्राचे सुध्दा शासकीय अधिकारी ते पत्रकार झालेल्या ठोकेने उल्लंघन केलेले आहे. याविरुध्द कार्यवाही व्हावी.
महानगरपालिका प्रशासन किती मोठ्या गंड्याच्या कातडीचे आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आले. अनेक खोटे पत्रकार या बेघर पत्रकारांच्या भुखंडांना खरेदी करत आहेत आणि त्यावर आपल्या इमारती बांधत आहेत. जागा महानगरपालिकेची म्हणजे नांदेडच्या सर्वसामन्य नागरीकाच्या मालकीची महानगरपालिकेने औक्षण म्हणून बेघर पत्रकारांना निवारा मिळावा यासाठी ती जागा दिली. परंतू बेघर पत्रकारांनी आणि त्यातल्या त्यात अभंगीने या सोसायटीची हिंम्मत बेघर पत्रकारांना दाखवली आणि निवारा नसलेले बेघर पत्रकार या सोसायटीमुळे करोडपती झाले.
बीएसयुपींच्या घरावर मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कब्जा
महानगरपालिकेचे प्रशासन कसे ढिम्म आहे हे श्रावस्तीनगर भागातील बीएसयुपीअंतर्गत बांधलेल्या इमारतीमध्ये मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारीच राहतात.याकडे कोणाचे लक्ष नाही. प्रत्येक जण आपल्या भाकरीवर तुप कसे येईल यासाठीच मेहनत करतांना दिसतो. नुतन मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी तरी या श्रावस्तीनगर भागातील बीएसयुपीच्या इमारतींची माहिती घ्यावी. त्यामध्ये माजी नगरसेवकाने काही जणांना पैसे घेवून त्या इमारतीतील रिकाम्या संकुलांवर कब्जा करण्याचे सुचवले. बीएसयुपीच्या इमारती ज्या लोकांसाठी तयार झाल्या. त्यांना त्याचा फायदा मिळालाच नाही. मग महानगरपालिकेची एवढी मोठी यंत्रणा काय करत आहे की, आपल्या इमारतीमध्ये बेकायदेशीर लोकांनी कब्जा मारलेला आहे हे त्यांना का दिसत नाही हा ही प्रश्न यानिमित्ताने मांडायचा आहे.
बेघर पत्रकारांच्या सोसायटीमधील सुरू असलेल्या बोगसगिरीची तक्रार भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने करण्यात आली