सोनखेडमध्ये ऊसाच्या फडात सापडला अनोळखी मृतदेह

पोलीसांनी जनतेला ओळख पटविण्याचे आवाहन केले
नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड जवळ एका उसाच्या शेतात आज एक 30-35 वर्षीय अनोळखी माणसाचा मृतदेह सापडला आहे. सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांनी जनतेला या माणसाची ओळख पटविण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले आहे.
आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास सोनखेड गावाच्या जवळच असलेल्या सोनखेड शेत शिवारामध्ये एका ऊसाच्या शेतात कुत्रांची पळापळ पाहुन शेत मालकाला शंका आली. त्याने आत पाहिले असता तेथे एक प्रेत पडलेले होते. या घटनेची माहिती त्वरीत सोनखेड पोलीसांना देण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर, त्यांचे अनेक पोलीस अंमलदार तेथे पोहचले.
त्या ठिकाणी मरण पावलेल्या अनोळखी माणसाचे वय 30 ते 35 वर्ष असावे. त्याची उंची 5 फुट असेल, बांधा मजबुत आहे. रंग सावळा आहे. त्याने काळी बनियान आणि निळी जिन्स परिधान केलेली आहे. प्रत्यक्ष पाहणारे लोक सांगत होते या माणसाला मरुन दोन दिवस झाले असतातील. सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणी या व्यक्तीला ओळखत असेल किंवा कोणी या वर्णनाचा व्यक्ती मिसिंग असेल तर त्यांनी सोनखेड पोलीसांशी संपर्क साधावा जेणे करून या मयत माणसाची ओळख पटेल. सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांचा मोबाईल क्रमांक 9070775446 आणि पोलीस उपनिरिक्षक परिहार यांचा मोबाईल क्रमांक 9823373495 यावर सुध्दा माहिती देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *