नांदेड(प्रतिनिधी)-गंगानगर किनवटमध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 97 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीत आरोपी सदरात 6 जणांची नावे दिलेली आहेत.
नारायण उत्तमराव राठोड रा.पाटोदा खुर्द ता.किनवट यांचे घर गंगानगर किनवट येथे आहे. त्यांच्या तक्रारीनुसार 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6.15 वाजेदरम्यान नारायण राठोड आणि त्यांच्या पत्नी धार्मिक कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गावी गेले होते. त्यावेळी पवन माहुरकर, विष्णु मेटकर, शाहरुख, दिपक सोळंके, राहुल गुंडावार सर्व रा.गंगानगर किनवट आणि त्यांच्या सोबत एक बंड्या नावाचा मुलगा ज्याचे पुर्ण नाव माहित नाही अशा सहा जणांनी त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 97 हजार 500 रुपयांचाचा ऐवज चोरलाआहे. किनवट पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 224/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 454, 380, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक झाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
किनवट येथे 4 लाखांची चोरी