नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या गरोदर पत्नीचा मुलीसह खून करणाऱ्या सैनिकाला आणि सोबत त्याचे आई-वडील अशा तिघांना कंधार प्रथमवर्ग न्यायालयाने 18 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आपल्याला पहिली मुलगी आणि दुसरी नको म्हणुन गरोदर पत्नीचा आणि लहान मुलीचा खून सैनिक असलेल्या एकनाथ मारोती जायभाये याने 13 सप्टेंबरच्या सकाळी केला. हा प्रकार मौजे बोरी उमरज ता.कंधार या गावात घडला. त्यानंतर सैनिकाची सासू देवशाला व्यंकटी केंद्रे रा.पळसवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी भाग्यश्री एकनाथ जायभाये (24) आणि लहान मुलगी सरस्वती एकनाथ जायभाये (4) या दोघांचा खून त्यांना दुसरी मुलगी नको या कारणासाठी आणि घरबांधकाम आणि मुलीचे संगोपनासाठी 4 लाख रुपये द्यावेत या कारणासाठी झाला. या तक्रारीत देवशाला केंद्रेने जावई एकनाथ मारोती जायभाये, त्याचे वडील मारोती रामकिशन जायभाये, आई अनुसया मारोती जायभाये आणि भाऊ दयानंद मारोती जायभाये या चौघांची नावे आरोपी सदरात लिहिली आहेत.
काल दि.14 सप्टेंबर रोजी माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांनी सैनिक एकनाथ मारोती जायभाये, त्याचे वडील मारोती आणि आई अनुसया या तिघांना अटक केली. सैनिकाचा भाऊ दयानंद हा औरंगाबादमध्ये नोकरीला आहे. काल पकडलेल्या एकनाथ मारोती जायभाये, त्याचे वडील मारोती आणि आई अनुसया या तिघांना सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांनी कंधार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालत हजर करून तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने या तिघांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2023/09/13/फौजी-नवऱ्याने-गर्भवती-पत/