
नांदेड(प्रतिनिधी)- संजय बियाणी प्रकरणातील एक मारेकरी रंगा यास त्यांनी गुन्हा करतांना वापरलेली दुचाकी ज्या ठिकाणी जाळली होती. त्या ठिकाणी पोळ्याच्या दिवशी त्या घटनेची पुर्नउभारणी करतांना देगलूर पोलीस ठाण्यातील एका पोलीसाने तेथे फोटो काढणाऱ्या युवकाला बेदम मारहाण करून काय मिळवले असा प्रश्न उपस्थित होते. त्यांचे साहेब उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी 11 सप्टेंबर रोजी किती पत्रकारांना फोन लावून फोटो काढण्यासाठी बोलावले या संदर्भाने त्यांचाही सीडीआरची चौकशी व्हायला हवी. सर्वोच्च न्यायालय आणि नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी पोलीस काम करत असतांना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढता येतो असे सांगितलेले आहे. याचाही विसर साहेबरावला पडला वाटते. देशमुख काही दिवसात बदली करून जातील पण साहेबरावजी आपले जीवन या नांदेडच्या मातीतच शेवटपर्यंत राहणार आहे.
संजय बियाणी यांच्या खून करणाऱ्या दोन पैकी एक दिपक उर्फ दिपुना उर्फ सुनिल सुरेशकुमार रंगा (23) रा.सुरखपुर ता.जि.झज्जर राज्य हरियाणा यास नांदेड पोलीसांनी हस्तांतरण वॉरंटवर नांदेडला आणले. मकोका न्यायालयाने रंगाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. त्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी न्यायालयात पाऊण तास आलेल्या पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी आरोपीची गाडी येणार ही बातमी आपल्या फोनवरून किती पत्रकारांना दिली याची चौकशी होणे सुध्दा गरजेचे आहे. रंगाचे नाव संजय बियाणीचा मारेकरी म्हणून एनआयएनेच प्रसिध्द केले होते. त्यामुळेच आता त्याची ओळख पटविण्याचा विषयच नाही. सोबतच गोळ्या झाडतांना रंगाने तोंडावर कपडा बांधलेला होता. म्हणून आज त्याचे तोंड लपविण्याची काही गरजही नव्हती. एनआयएने त्याचे छायाचित्र सुध्दा प्रसिध्द केले होते.
पोळ्याच्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत असलेल्या रंगाला काही पोलीस अधिकारी, क्युआरटीचे जवान आणि संजय देशमुख यांनी कुंटूर जवळच्या त्या जागी नेले जेथे संजय बियाणींचा खून करतांना वापरलेली दुचाकी जाळ्यात आली होती. घटनेची पुर्नउभारणी करणे हा पोलीस प्रक्रियेतील एक भाग आहे. अशा अनेक जागी पुर्नउभारण्या त्यांना कराव्या लागतील. प्रत्येक जागी आरोपीला घेवून जावे लागेल. हा कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. त्या ठिकाणी पोलीस, आरोपी पाहुन एका युवकाने या घटनेचा फोटो काढला. त्या युवकाने फोटो काढल्याचा राग देगलूर येथील पोलीस अंमलदार साहेबराव सगरोळीकर यांना आला अणि त्यांनी त्या युवकाला बेदम मारहाण करत तुला सुध्दा आरोपी करील अशी धमकी दिली. यावेळी साहेबरावजींना हे लक्षात राहिले नाही की, सर्वोच्च न्यायालयाने पोलीस काम करत असतांना फोटो आणि व्हिडीओ काढण्यावर कोणतीही बंदी नसते असे सांगितलेले आहे. तसेच नागपुरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे व्हिडीओमध्ये अमितेशकुमार सांगतात की, युनिफॉर्म(गणवेश) घालून आमचा पोलीस अधिकारी किंवा अधिकारी काम करत असेल तर त्यावेळेस त्याचा फोटो आणि त्याचा व्हिडीओ काढण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. मग साहेबरावजी यांनी केलेली मारहाण सहज मानता येईल काय?
या पथकाचे प्रमुख श्रीमान चंद्रसेन देशमुख यांनी देगलूर गेल्यानंतर कोण-कोणत्या दरात वाढ केली. ती दर वाढ कायद्यानुसार आहे काय?, या प्रश्नांची उत्तरे कोण देईल. असे सांगतात चंद्रसेन देशमुख फार विद्वान आहेत. ते कसे विद्वान आहेत हे लिहायचे असेल तर जागा अपुरी पडेल. त्यांच्याकडे एक चांगला कौशल्याने तपास करण्याचा गुन्हा आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करावे आणि त्या गुन्ह्याच्या उर्वरीत दोषारोपपत्राला न्याय देवून संजय बियाणीचा खून करणाऱ्यांना शिक्षेपर्यंत पोहचवावे ही महत्वाची अपेक्षा आहे.