नांदेड(प्रतिनिधी)-माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावर अनेकांच्या मनात आनंद भरून वाहत आहे की, आता तरी आमचा क्रमांक लागेल. पण खरे तर बॅंकेत झालेल्या बोगस एटीएम व्यवहारामुळे माजी आ.वसंत चव्हाण यांनी बॅंकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असेल.
काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान बोगस एटीएमद्वारे काढल्याचा एक प्रकार घडला. हे अनुदान सौ.निशा विजय सोनवणे यांचे होते. त्यांनी आपल्या खात्यावर एटीएमच घेतले नव्हते. मग एटीएम कोणी मागितले, कोणाला दिले असे अनेक प्रश्न अर्धवटच राहिले. त्याबाबत उमरी पोलीस ठाण्यात अज्ञात एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे.
हा प्रकार उमरी शाखेतच घडला असेल असे नाही म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते विजयदादा सोनवणे यांनी याबाबत ईडी, सहकार मंत्री अशा अनेकांकडे तक्रारी केल्या. त्याा तक्रारींची चौकशी सुरू झाली. एटीएम काढणे हा काही एका व्यक्तीचा खेळ असू शकत नाही. कारण त्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर एटीएम मंजुर होते, त्यानंतर शाखा व्यवस्थापकासमोर एटीएम धारकाला एटीएम कार्डवर आपली स्वाक्षरी करावी लागते आणि त्यानंतर एटीएमचे पिन दिले जाते. हा सर्व प्रकार बॅंकेतच घडला असेल ना? एटीएम कार्ड वापरतांना आपण बॅंकेत दिलेल्या मोबाईलवर ओटीपी येतो आणि त्यानंतर तो ओटीपी टाकून पैसे काढता येतात.
नांदेड जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जवळपास 66 शाखा आहेत. हा बोगस एटीएमचा घोळ सर्वच शाखांमध्ये झाला असेल आणि या सर्व शाखांचे प्रमुख अध्यक्ष हे आहेतच. म्हणून बहुदा एटीएमचा घोळ आपल्या अंगावर येईल म्हणून माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असेल अशी एक चर्चा सुरू झाली आहे.
एटीएमच्या घोळानंतर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी दिला राजीनामा