उमरी (प्रतिनिधी)- श्रीवरी परकामनी सेवा तिरुमला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेश येथे दि. ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत तिरुमला येथे श्रीवरी परकामनी सेवा ( हुंडी मधील रक्कम मोजदाद ) शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या मधून निवड करण्यात आली. जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, माधव कोल्हे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गंगाधर गन्लेवार, आरोग्य कर्मचारी महेश सातारे, अजित कोटूरवार, हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड कार्यालय येथील कनिष्ठ लिपिक शंकर दंतुलवार, पोस्ट मास्टर रविंद्र भालेराव यांची निवड झाली होती त्यांनी श्रीवरी परकामनी सेवा पुर्ण करुन बालाजी चांडोळकर हे सर्व जण आज इंटरसिटी एक्स्प्रेसने परत आले असता.
त्यांचा आज उमरी रेल्वे स्टेशन येथे टिप्रेसवार परिवार उमरी यांच्या वतीने त्यांचा पुष्पहार घालून स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी बालाजी टिप्रेसवार, संदीप टिप्रेसवार,महेश टिप्रेसवार आदी उपस्थित होते.