नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्चच्या गुरूद्वारा प्रकरणात 33 युवक गुरूद्वारा बोर्डाच्या आदेशावरुन त्या ठिकाणी काम करत असतांना दोन जणांची नावे गुन्हा क्रमांक 114 मध्ये अडकविण्यात आल्याची माहिती या प्रकरणातील आरोपी गुरमितसिंघ देवेंद्रसिंघ महाजन यांनी दिली आहे. मागील तीन महिन्यापासून ते फरार आहेत.
गुरमितसिंघ उर्फ बादलसिंघ देवेंद्रसिंघ महाजन (25) रा.अबचलनगर नांदेड हे गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने असलेल्या अश्व शाळेमध्ये काम करतात. 29 मार्चच्या अगोदर 27 मार्च रोजी गुरमितसिंघ यांनी पोलीसांनाकडे दिलेल्या जबाबाप्रमाणे गुरुद्वारा बोर्डाच्या आदेशाप्रमाणे काम करणे ही आमची जबाबदारी आहे. 29 मार्च रोजी साजरा होणाऱ्या हल्ला-महल्ला कार्यक्रमाचे नियोजन गुरूद्वारा बोर्ड करत असते. त्यातील सर्व जबाबदारी ही गुरूद्वारा बोर्डावर आहे.
दुर्देवाने 29 मार्च रोजी या कार्यक्रमादरम्यान एक अप्रिय घटना घडली आणि त्यात कांही जणांनी घातलेला गोंधळ सर्व समाजाच्या मुळावर आला असे गुरमितसिंघ महाजन सांगत होते. त्यांनी पाठविलेल्या एका पत्रात गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक यांनी स्वाक्षरी केलेल्यापत्रात एकूण 33 युवकांची नावे आहेत. जी गुरूद्वारा बोर्डाची सेवक आहेत. त्यात 28 क्रमांकावर गुरमितसिंघ उर्फ बादलसिंघ देवेंद्रसिंघ महाजन यांचे नाव आहे. तर 29 क्रमांकावर प्रकाशसिंघ नावाच्या युवकाचे नाव आहे. गुरमितसिंघ सांगत होते की, माझी पत्नी गरोदर आहे आणि मी गुन्हा क्रमांक 114 मध्ये नाव असल्या कारणाने फरार झालो आहे. वास्तविक मी गुरूद्वारा बोर्डाच्या आदेशाने त्या दिवशी तेथे काम करत होतो. तरीपण माझे नाव आणि माझा सहकारी प्रकाशसिंघ यांचेही नाव या गुन्ह्यात गोवले गेले. 33 लोकांपैकी दोघांचे नाव गुन्ह्यात गोवले गेले याबद्दल कोणी तरी कांही तरी पुर्व दुश्मनी काढली असा माझा अंदाज आहे. पोलीसांच्या प्रत्येक कामात मी नेहमीच मदत केली. तरीपण माझे खोटे नाव या प्रकरणात गोवले गेल्याचे दु:ख गुरमितसिंघ उर्फ बादलसिंघ देवेंद्रसिंघ महाजन यांना आहे.
29 मार्च गुन्हा क्रमांक 114 मध्ये माझे नाव खोटे गोवले ; मी बोर्डाचा सेवक आहे -महाजन