नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने चार युवकांना पकडून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल आणि 15 जिवंत काडतूस असा 99 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेत नव्याने नियुक्त सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांचे पथक आज गस्त करत असतांना माळटेकडी उड्डाणपुलाच्याखाली काही युवक गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी आपले पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना माहिती देवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार माळटेकडी उड्डाणपुलाखाली रचलेल्या सापळ्यात सय्यद सद्दाम सय्यद मैनोद्दीन (24) रा.दत्तनगर पालम जि.परभणी, सुरज उर्फ रावण शेषराव वंजारे (20)रा.पिंपळकौठा (मगरे) ता.मुदखेड जि.नांदेड ह.मु.विद्यानगर नांदेड आणि शुभम अशोक वायवळ (20) रा.शंकरनगर जैनमंदिर ता.जि.नांदेड तसेच सुमित उर्फ छोटा पाप्या साहेबराव जोगदंड (19) रा.साठेचौक नांदेड असे चार जण सापडले. त्यातील सय्यद सद्दाम, सुरज उर्फ रावण आणि अशोक वायवळ यांच्याकडून प्रत्येकी एक गावठी पिस्टल असे तीन पिस्टल आणि प्रत्येकाकडे पाच जीवंत काडतुस असे 15 जिवंत काडतुस सापडले.
याप्रकरणात सापडलेले चार जणांपैकी एक सय्यद सद्दाम सय्यद मैनोद्दीन याच्याविरुध्द परभणी पोलीसांनी मकोका कायदा लावलेला आहे हा युवका मकोका कायदातील फरार गुन्हेगार आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वैजनाथ वाहुळे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन वृत्त लिहिपर्यंत चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी ही कामगिरी करणारे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार माधव केंद्रे, गुंडेराव कर्ले, संग्राम केंद्रे, संजीव जिंगलवाड, बालाजी यादगिरवाड, विलास कदम,, गजानन बैनवाड, देवा चव्हाण, धुमाळ, अर्जुन शिंदे, हनुमानसिंह ठाकूर, दिपक ओढणे आदींचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने चार युवकांना पकडून तीन गावठी पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुस पकडले