तृतीय पंथीयांच्या समुहासाठी आमदार द्या-डॉ.सान्वी जेठवाणी

नांदेड(प्रतिनिधी)-तृतीयपंथी कल्याण मंडळ सदस्य डॉक्टर सान्वी जेठवणी यांनी शिष्ठ मंडळ तयार करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना भेटून तृतीयपंथी यांच्या अनेक समस्यांना मांडून व त्यांच्या हक्कासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे मुख्य मागणी म्हणजे विधान परिषदेमध्ये तृतीयपंथी आमदार प्रतिनिधी पाठवावा जेणेकरून आज महाराष्ट्र मधील चार ते पाच लाख तृतीयपंथी यांची समस्या मांडण्यासाठी मंडळ देखील अद्यापही व्यवस्थित स्थापन नाही याची हालचाल जरी सुरू आहेत तरीही मोठ्या प्रमाणावर यांच्या समस्या व उदरनिर्वाहाचा प्रश्न हे मार्गी लावायचं असेल तर सभागृह मध्ये आवाज जाणं गरजेचं आहे असे या निवेदनद्वारे नमूद करण्यात आलं आहे.

यासोबतच या निवेदन मध्ये 2019 वर्षी उच्च न्यायालयाचा निर्देशानुसार प्रत्येक राज्याने तृतीयपंथी यांच्यासाठी शासकीय नोकरीमध्ये किंवा कुठल्याही भरतीमध्ये आरक्षण देता येईल का याकडे वाटचाल करत कार्यवाही करण्यासाठी निर्देशित केलं होतं परंतु इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात अद्यापही आरक्षण मिळालेलं नाही काही राज्यांनी याची अंमलबजावणी करत त्यामध्ये तृतीयपंथी यांना शासकीय नोकरी व भरतीमध्ये सामील करून घेतला आहे महाराष्ट्रामध्ये जिथे मराठा आरक्षण हा फार मोठा मुद्दा आहे तिथे तृतीयपंथी हा आरक्षण देखील मोठा आहे परंतु याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे असे या निवेदन मध्ये सांगण्यात आलं आहे.

तृतीयपंथी मंडळीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक भवन व मोफत हॉस्टेल सुविधा असणं गरजेचं आहे जेणेकरून घरातून हाकललेले तृतीयपंथी यांना राहण्याची सोय होईल व त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी त्यांना मदत होईल त्यासोबत आज शासकीय नोकरीमध्ये विविध मंडळी कार्यरत आहे त्यांना देखील जर आपल्या सेक्स री असाइनमेंट सर्जरी करायचे असेल तर त्यांना कुठलेही धोरण नसल्याने त्रास होत आहे त्याचा उदाहरण म्हणजे नांदेड येथील मराठा मध्ये पोलीस जमादार वर्षा पवार उर्फ विजय पवार यास अद्यापही परवानगी न मिळाली कारण पोलीस खात्याकडे कुठलेही शासकीय धोरण नाही ज्यामध्ये लिंग परिवर्तनासाठी मार्गदर्शन असावा.

ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालकल्याण साठी विशेष कार्यालय आहे त्या पद्धतीने तृतीयपंथी यांच्यासाठी विशेष कार्यालय व डिपार्टमेंट असावं अशी विनंती देखील करण्यात आली यासोबत तृतीयपंथी कल्याण मंडळ जे स्थापन होत आहे त्याला उपशासकीय दर्जा मिळावा जेणेकरून कार्यामध्ये आणखीन प्रगतिशील कार्य करण्यामध्ये मदत होईल असं त्यांनी यामध्ये नमूद केला आहे यासोबत नॅशनल सर्विस पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी मार्फत समाज कल्याणच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या रहिवाशांना तृतीयपंथी ओळखपत्र देण्यात येत यामधून काही लोकांचे आधार कार्ड व पॅन कार्ड हे पुरुष किंवा स्त्री असल्याकारणाने सर्वे करताना तृतीयपंथी यांचा आढावा व्यवस्थित मिळत नाहीये त्यामुळे तृतीयपंथी आढावा घेण्यासाठी याला आधार कार्डशी लिंक करावा व आधार कार्ड जोडणी करणे आपल्याला सर्वे मध्ये मदत होईल असं देखील या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

यासोबतच जेठवाणी हे महाराष्ट्राचे पोलीस मुख्य कार्यालयात आईची के प्रसन्न यांची भेट घेऊन वर्षा उर्फ विजय पवार मराठा येथील जमादारच प्रश्न त्वरित सोडवावा व त्यांना लिंग परिवर्तनासाठी परवानगी देण्यात यावी असे निवेदन करत त्यांनाही भेटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *