नांदेड (जिमाका) – महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयातील अंगणवाडी मदतनिसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज 10 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी http//nanded.gov.in या संकेतस्थळावर व तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या नोटीस बोर्डावर 18 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि. एस. बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
नांदेड जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी ऍड. कदम्ब
सदस्यपदी डॉ.सत्यभामा जाधव, किशोर नावंदे, ऍड. रेखा तोरणेकर आणि संगीता कांबळे नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एका अधिसुचनेनुसार नांदेड…
गावठी पिस्तुल प्रकरणात महिलेला अटकपुर्व अंतरिम जामीन
नांदेड़ (प्रतिनिधि)-आरोपी सांगतो की मला माझ्या आईने पिस्तुल आणायला पैसे दिले म्हणून त्या मुलासह आईला आरोपी करण्यात आल्याचा प्रकार नांदेड…
कंधारेवाडी येथे तीन घर फोडले
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कंधारेवाडी ता.कंधार येथे तीन घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.मौजे आदमपूर ता.बिलोली येथून एका…