नांदेड (प्रतिनिधी)-स्वाधार योजनेसह विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 21 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुले, शाहु, आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिरी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती सन 2020 ते 2023 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनतील रक्कम अद्यापही विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातवर जमा झाली नाही. तसेच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे कागदपत्रे टि.सी, मार्कमेमो महाविद्यालयाकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाचे याक डे लक्ष वेधण्यासाठी फुले, शाहु, आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भारत सरकार शिष्यवृत्ती रक्कमेत महागाई भत्यानुसार वाढ करण्यात यावे, स्वाधार योजनेची तालुका स्तरावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावे, योजनेची 50 टक्केची जाचक अट रद्द करून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती हे शैक्षणिक वर्षे संपविण्यापूर्वी विद्यार्थ्यांची रक्कम करण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती अभावी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रेसाठी अडवणूक केली जात आहे यावर आळा घालावा, भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजना व इतर शिष्यवृत्ती वजेट वाढविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
Related Posts
दहशतवाद विरोधी पथकाचे न्यायालयीन कामकाज आता ऍड. यादव तळेगावकर सांभाळणार
नांदेड(प्रतिनिधी)-दहशतवाद विरोधी पथकातील न्यायालयामध्ये असणाऱ्या खटल्यांची बाजू नांदेड येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता तथा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड.यादव प्रकाश तळेगावकर यांनी…
ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी अल्पवयीन बालक घरी पाठवला
नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी 14 जून रोजी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एका अल्पवयीन बालकाला शोधले. तो संशयास्पद परिस्थितीत होता. त्याला…
माध्यमांनी बातमीची सत्यता पडताळावी-न्या.जज
संविधान उद्देशिका देवून पत्रकारांचा सत्कार नांदेड (प्रतिनिधी)-माध्यमात काम करत असताना धावपळ असते, मात्र असे असेल तरी चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ…