नांदेड(प्रतिनिधी)-खलबत्याच्या दगडाने आपल्या आईवर हल्ला करून तिचा जिव घेणाऱ्या 25 वर्षीय पुत्राला कुंटूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मौजे बरबडा येथे गोदावरीबाई लिंगोबा वटपलवाड (52) यांचा खून झाल्याची माहिती कुंटूर पोलीसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल बहात्तरे, पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार त्वरीत घटनास्थळी पोहचले. बरबडा गावात प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपल्या आई गोदावरीबाईचा खून त्यांचा मुलगा श्रीनिवास लिंगोबा वटपलवाड(25) याने खलबत्यातील दगडाने शरिरावर अनेक जागी ठेचून खून केला आहे. फॉरेन्सीक पथक घटनास्थळी पोहचले आहे. पोलीसांनी मारेकरी पुत्राला ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिपर्यंत पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती.
खलबत्याच्या दगडाने ठेचून आईचा खून करणारा पुत्र पोलीसांच्या ताब्यात