धर्माबाद(प्रतिनिधी)-गोरठा शिवारातील पैहेलवान धाबा येथे रस्त्यावर जुगार खेळणाऱ्या 47 जणांना विशेष पोलीस पथकाने काल पकडले. या लोकांकडून 7 लाख 22 हजार 850 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
धर्माबाद येथील पोलीस उपनिरिक्षक विजय लिंगुराम पंतोजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 सप्टेंबरच्या दुपारी 3.23 वाजता उमरी ते गोरठा रस्त्यावर पैहेलवान धाब्यासमोर रस्त्यावर जुगार खेळणाऱ्या लोकांवर त्यांनी धाड टाकली. त्या ठिकाणी सापडलेले जुगारी 1) गंगाधर पालदेवाडवय 58 वर्षे धंदा शेती राहणार गोरठा 2) परमेश्वर लोकडाची सावंत वय 34 वर्ष व्यवसाय शेती राहणार गोरठा 5) गौतम जळबा लांडगे वय 35 वर्ष व्यवसाय मजुरी शिंगणापूर 4) सिद्धांत विठ्ठल कांबळे वय 23 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार फुलेनगर धर्माबाद 5) रामकिशन विलास सावंत वय 28 वर्ष व्यवसाय शेती राहणार गोरठा 6 ) अविनाश रामराव भद्रे वय 22 वर्ष व्यवसाय मजुरीराहणार फुलेनगर धर्माबाद 7) मारुती विठ्ठल यनगुदलवाड वय 39 वर्ष राहणार शिरूर 8 ) बालाजी विठ्ठल अकलूज वय 36 वर्ष राहणार आतुकुर ता. धर्माबाद 9) राजेश शेषराव वाघमारे वय 23 वर्ष राहणार निळे गव्हाण ता. नायगाव 10) माधव कोंडीबा सरजी वय 33 वर्ष राहणार चौक गल्ली उमरी 11 ) बाळू हिरामण सोळंके वय 32 वर्षे राहणार सोमठाणा 12 ) गजानन देवराव गोमासे वय तीस वर्षे राहणार गोरठा 13) लक्ष्मण संभाजी बोडके वय 49 वर्षे राहणार गोरठा 14 ) विशाल संजय पिल्लेवाड वय 22 वर्षे राहणार फुलेनगर ता धर्माबाद 15) संतोष नागोराव हंबर्डे वय 35 वर्षे राहणार पाटोदा ता नायगाव 16 ) दत्ता हिरामण जाधव वय 25 वर्ष राहणार आटाळा ता धर्माबाद 17) संजय शंकर बागेवाड वय 25 वर्ष राहणार घुंगराळा ता नायगाव 18 ) संतोष निवृत्ती वानखेडे व 34 वर्ष राहणार सावरखेड ता नायगाव 19) संजय मोहनराव हनुमंते वय 39 वर्षे राहणार पिंपळकोठा ता मुदखेड 20) बजरंग देविदास हेमके वय 27 वर्ष राहणार शिवाजीनगर मुदखेड 21 ) अविनाश बालाजी कांबळे वय 24 वर्षे राहणार गोरठा 22 ) विठ्ठल लक्ष्मण नाईकवाड वय 40 वर्षे राहणार जामगाव ता उमरी 23) संजय लालू वावळे वय तीस वर्षे राहणार फुलेनगर धर्माबाद 24 ) संभाजी आत्माराम ढगे वय 30 वर्षे राहणार वाडी ता. उमरी 25) लक्ष्मण दत्तात्रय वडनावार वय 36 वर्ष राहणार विद्यानगर धर्माबाद 26) धनराज बालाजी पवळे वय 22 वर्षे राहणार नरसी ता. नायगाव 27 ) शंकर धर्माजी सरगुलवाड वय 37 वर्ष राहणार रावधानोरा ता. उमरी 28 ) साईनाथ रमेश पालदेवाड वय 29 वर्षे राहणार गोरठा ता. उमरी 29) दिगंबर पर्वत गायकवाड वय 35 वर्षे राहणार येळेगाव ता भोकर 30) देविदास माधवराव दांगट वय 40 वर्ष राहणार गोरठा ता. उमरी 31) गोविंद पुरभागुटे वय 35 वर्षे राहणार गोरठा 32) नागण मारुती गोमासे वय 35 वर्षे राहणार गोरठा 33 ) शेख इलियास शेख रहीम वय 31 वर्षे राहणार फुलेनगर धर्माबाद 34 ) राहुल बापूराव हिजगरे वय 29 वर्षे राहणार सावरखेड ता नायगाव 35 ) भगवान शिवाजो भरकड वय 22 वर्षे राहणार गोरठा 36 ) संपत महाजन सूर्यवंशी वय 40 वर्षे राहणार शिवणगाव ता. उमरी 37 ) संभाजी बाबू सावंत वय 34 वर्षे राहणार गोरठा 38 ) प्रवीण सुभाषराव जाधव वय 32 वर्षे राहणार नांदा ता भोकर 39 ) भीमराव पुंडलिक बुद्धिवंत वय 50 वर्षे राहणार ” आलूर ता धर्माबाद 40) बळी गणपती गायकवाड व 27 वर्ष राहणार सावरखेडा ता नायगाव 41 ) सचिन उद्धवराव पाटील वय 32 वर्षे राहणार लाईन गल्ली देगलूर 42 ) गजानन बालाजी शिंदे वय 25 वर्ष राहणार फुलेनगर धर्माबाद 43 ) कैलांस नागोराव कपाटे वय 32 वर्षे राहणार मिरची मार्केट धर्माबाद 44 ) रामदास श्रीराम कदम वय 47 वर्षे राहणार शेलगाव ता. उमरी 45 ) दत्ता दिगंबर गन गोपालवाड वय 34 वर्षे राहणार येळेगाव ता भोकर 46 ) बालाजी संभाजी बोडके वय 40 वर्ष राहणार गोरठा 47 ) माधव चंद्र सावंत वय 35 वर्ष राहणार गोरठा ता. उमरी असे आहेत.
विशेष पोलीस पथकाने त्या ठिकाणी जुगाऱ्यांकडून 7 लाख 22 हजार 850 रुपये रोख रक्कम, 1 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या अशा एकूण 8 लाख 47 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उमरी पोलीसांनी 47 जणांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 267/2023 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उमरीचे पोलीस निरिक्षक व्ही.के.झुंजारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.आर.कऱ्हे हे करीत आहेत.
52 पत्यांचा जुगार; 47 जुगारी; 7 लाख 23 हजार रोख रक्कम जप्त