पोलीस सांगतात राजेश पवार आमदार आहेत !
नांदेड(प्रतिनिधी)-वसरणी भागात असलेल्या गट क्रमांक 55 आणि 56 मध्ये आ.राजेश संभाजी पवार यांनी माझ्या जागेत अतिक्रमण करत असल्याची तक्रार सय्यद सुलतानोद्दीन इनामदार यांनी न्यायालय, पोलीस विभागाकडे केली आहे. न्यायालयाच्या प्रकरणात या जमीनीबाबत 27 सप्टेंबर रोजी एक आदेश होणार आहे. 27 तारेखपर्यंत गट क्रमांक 55 आणि 56 च्या सिमारेषेवर कोणतेही काम आमदार राजेश पवार यांनी करू नये असे आदेशीत केले असतांना सुध्दा त्या ठिकाणी काम सुरू आहे. पोलीस विभाग मात्र आमदार आहेत या वाक्यासोबत वागत आहेत.
सय्यद सुलतानोद्दीन इनामदार यांनी दिवाणी दावा क्रमांक 108/2023 न्यायालयात दाखल केला. कारण त्यांची वसरणी भागात गट क्रमांक 56 मध्ये 1 हेक्टर 28 आर अर्थात 12800 चौरस मिटर एवढी जागा आमदार राजेश संभाजी पवार यांची आहे आणि त्याला लागूनच इनामदार यांचा गट क्रमांक 55 आह.भुमिअभिलेख कार्यालयाच्या लोकांशी हातमिळवणी करून आ.राजेश पवार यांनी चुकीचे लेआऊट टाकून त्याचे काम सुरू केले आहे. त्या कामामुळे इनामदार यांच्या जमीनीत अतिक्रमण होत आहे. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बऱ्याच महिन्यांपासून तक्रारी देणे चालू आहे. परंतू काहीच निर्णय होत नाही. म्हणून इनामदार यांनी न्यायालयात खटला क्रमांक 108/2023 दाखल केला. या खटल्यात दि.21 सप्टेंबर रोजी न्यायालयाने आमदार राजेश पवार आणि त्यांच्या हस्तकांना गट क्रमांक 55 आणि 56 च्या सिमारेषांवर कोणतेही बांधकाम करू नये असे आदेश दिले असतांना सुध्दा 21 सप्टेंबरनंतर आलेल्या सुट्यांचा आधार घेवून आ.राजेश पवार आणि त्यांचे हस्तक इनामदार यांच्या जमीनीवर अतिक्रमण करून आमचा लेआऊट खरा आहे असे दाखवत आहेत. इनामदारांनी पोलीसांकडे दाद मागितली असता पोलीस विभाग राजेश पवार आमदार आहेत असे एकच वाक्य बोलत आहेत. याचा अर्थ आमदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणतेही बेकायदेशीर काम करण्याची मुभा आहे काय?
संबंधीत व्हिडीओ….
आमदार राजेश पवारांनी माझ्या जागेवर अतिक्रमण केले-इनामदार