नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. तसेच वजिराबाद आणि शिवाजीनगर भागातून दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. या 6 चोरीच्या घटनांमध्ये एकूण 1 लाख 69 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
दशरथ सोनाजी धोतरे यांची दुचाकी गाडी क्रमांक दातीवाला पेट्रोल पंप येथून 30 जूनच्या सायंकाळी 7 ते 1 जुलैच्या सकाळी 8 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीचा क्रमांक एम.एच.26 बी.आर.0982 असा आहे. या गाडीची किंमत 50 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कानगुलकर अधिक तपास करीत आहेत.
नारायण भिमराव झुंझुल्डे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.38 टी.2037 ही गुरूजी चौक वाडी बु येथून 9 जुलैच्या रात्री 8 ते 10 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 70 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार बोरकर अधिक तपास करीत आहेत.
ज्ञानेश्र्वर संभाजी शिंदे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.0327 ही गाडी वाजेगाव बायपास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या पाठीमागून 8 जुलै रोजी रात्री 4 ते पहाटे 6 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 9 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
गणपत बालाजी पावडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 जे.3379 ही गाडी कामठा म्हशीचा बाजार येथून 4 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.15 दरम्यान चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार लोखंडे अधिक तपास करीत आहेत.
रुपाराम हेमराम निवासी यांची फुले मार्केटजवळ हरीओम रबडीवाला अशी दुकान आहे. दि.10 जुलैच्या सकाळी 10 वाजता त्यांचा 12 हजार 400 रुपयांचा मोबाईल त्यांनी चार्जिंगला लावला असतांना कोणी तरी चोरुन नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिरी अधिक तपास करीत आहेत.
विनायक बबनराव शेळके यांचा मोबाईल महेंद्रकर हॉस्पीटल मधून 22 जूनच्या सकाळी 5 ते 5.30 वाजेदरम्यान ते झोपले असतांन चोरीला गेला आहे. या मोबाईलची किंमत 8 हजार रुपये आहे. वजिराबाद पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार लांछगेवाड हे करीत आहेत.
शहरातून चार दुचाकी गाड्या आणि दोन मोबाईल चोरीला गेले