पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरांना बोलतांना भान ठेवा; नाही तर स्टेशन डायरीमध्ये नोंद होईल

नांदेड(प्रतिनिधी)-खासदार, आमदार आणि इतर सर्व नेत्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगुण लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना बोलायचे आहे. कारण काल-परवाच ओमकांत चिंचोळकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेची नोंद श्रीमान ओमकांत चिंचोळकर यांनी स्टेशन डायरीमध्ये घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्टेशन डायरीच्या नोंदी म्हणजे एका धार्मिक ग्रंथातल्या नोंदी आहेत असा उल्लेख केलेला आहे. आता काही खरे नाही कारण ओमकांत चिंचोळकर स्टेशन डायरीमध्ये काय लिहितील ते तर फक्त त्यांनाच माहित.
भारतात भारतीय संविधानाप्रमाणे कामकाज चालते. त्यासाठी जवळपास 1100 कायदे अस्तित्वा आहेत. त्या कायद्यांना अंमलबजावणीत आणण्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत. त्यात एक विभाग पोलीस दल आहे. ओमकांत चिंचोळकर यांना आल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी पाठविण्यात आले. काही शब्द गुंड त्यांना शिंक आली तरी बातमी करतात. हा त्यांचा मागच्या काळातील प्रभाव आहे असो. कोणाला आपली लेखणी कोणासाठी झिजवायची हा त्याचा-त्याचा वेगवेगळा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत हे काम चालले आहे. काल परवा ओमकांत चिंचोळकर यांनी पोलीस ठाणे लोहा येथे भरपूर दुचाकी गाड्यांवर कार्यवाही केली. त्यातून हजारो रुपये दंड वसुल झाल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. त्या बातम्यांप्रमाणे तो दंड वसुल आहे की फक्त अनपेड आहे. या बद्दल काही माहिती मिळाली नाही. राज्यात लाखो गाड्यांवर लावलेले दंड फक्त दंड आहेत. त्यातील कोटयावधी रुपये अजूनही अनपेड दंड आहे. म्हणूनच म्हणतात कॅमेरा फक्त फोटो बनवतो आपली इमेज स्वत: बनवावी लागते.
आमदारांना सन्मान देणे हा सुविधा कायद्याचा भागच आहे. एका कार्यक्रमाच्यानंतर आमदारांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात पकडलेल्या गाड्यांबाबत माहिती घेतल्यानंतर चिंचोळकरांना सांगितले की, गाड्या जप्त तुम्हाला करता येणार नाहीत. पण त्यावर चिंचोळकरांनी मी कायदेशीर कार्यवाही केली असे सांगितले. शब्द हेच होते की, अजून काही हे देवच जाणे, पण म्हणतातना शब्दांमध्ये सुध्दा तापमान असते. ते कधी माणसाला सांत्वना करतात तर कधी जाळून टाकतात. म्हणून सर्वांनी प्रामाणिकपणे आपले काम केले पाहिजे.
मोटार वाहन कायद्याबद्दल जर आमदारांनी सांगितले असेल तर ते मागे महाराष्ट्राचे वाहतुक आयुक्त होते. म्हणून त्यांना मोटार वाहन कायद्या पुर्णपणे माहित असणारच आणि म्हणूनच त्यांनी गाड्या तुम्हाला जप्त करता येणार नाहीत असे ओमकांत चिंचोळकरांना सांगितले असेल. असो ऐकणे किंवा न ऐकणे हा प्रत्येकाचा आपला-आपला भाग आहे. सोबतच पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरांनी या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक हलगे यांच्याकडे असल्याचे सांगून आपली जबाबदारी पण झटकली सीआरपीसीमाणे(फौजदारी प्रक्रिया संहिता) पोलीस ठाण्यातील प्रत्येक घटनेची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यावर असते आणि लोह्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर आहेत. काही वर्तमानपत्रांनी प्रसिध्द केलेली बातमी वाचली असता ती बातमी त्यांनीच प्रसारीत केली आहे असे दिसते. परंतू या बातमीनंतर पदाधिकाऱ्यांनी आता सावधपणे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरांना बोलावे लागेल असाच या बातमीचा आशय दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *