पुण्यातील पोलीस अंमलदाराला मिळाली 135 दिवसांची अर्जित रजा ; राज्यातील इतर पोलीस अंमलदारांना हा अधिकार का नाही?

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील लोकांना रजांसाठी प्रत्येक वेळेस अनेक उंबरठे झिजवल्या नंतर कधी तरी आळीपाळीने रजा दिली जाते. पण पुणे येथील पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी एस.आर.भालचिम यांनी पुणे शहरातील तीन पोलीस अंमलदारांच्या रजा मंजुर केल्या आहेत. त्यात सर्वाधिक 135 दिवसांच्या रजा पोलीस अंमलदार ए.बी.गावडे यांना देण्यात आली आहेत. हे सर्व पोलीस अंमलदार बिनतारी संदेश विभाग पुणे शहर येथे कार्यरत आहेत.

पोलीस विभागात अनेक प्रकारच्या रजा आहेत. ज्यामध्ये किरकोळ रजा, प्रत्यार्पित रजा, अर्जित रजा असे प्रकार आहेत आणि आजारी रजा. आजारी रजा घेतल्यानंतर त्या रजेला प्रत्यार्पित रजेत बदलले जाते आणि जमा असलेल्या रजेच्या संख्येतून त्या रजा कमी केल्या जातात. अशा सर्व अडचणी असतांना सुध्दा मंजुर असलेली रजा एकदा कधीच दिली जात नाही. पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना 30 दिवसांची रजा हवी असेल तर त्यांना 10 दिवसांची रजा दिली जाते. काही जण ‘जाऊन येतो’ या शब्दांवर सुध्दा बऱ्याच रजा उपभोगतात त्या रजांचा कोठेच ताळमेळ नसतो आणि त्या रजांचा हिशोबही नसतो. कांहीं पोलीस अंमलदार कोणत्या रजेवर आहेत हे कधीच कळत सुद्धा नाही. अश्या प्रकारे अंधाधुंद कार्यक्रम या रजांच्या विषयी पोलीस विभागात सुरू असतो. पण पुणे शहरातील पोलीस अंमलदार ए.बी.गावडे यांनी मिळवलेल्या 135 दिवसांच्या रजा ह्या सुध्दा पुर्णपणे कायदेशीर आहेत. कारण त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. आपल्या विभागासाठी देण्यात आलेल्या सुविधांचे लक्ष ते कायम ठेवतात आणि त्यामुळे त्यांच्या अर्जांवर अशा प्रकारचे आदेश होतात. महाराष्ट्र पोलीस विभागात जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आहेत . मग पोलीस अंमलदार गावडे हे एकटेच शासनाचे सेवक आहेत काय? किंवा शासनाकडे त्यांना जास्त मुभा आहे काय?, शासनामध्ये त्यांच्याच कामाकडेच फक्त लक्ष दिले जाते काय ? या प्रश्नांना उपस्थित करतांना पोलीस अंमलदार ए.बी.गावडे यांना मिळणाऱ्या सुविधा महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना मिळायला हव्या अशी या शब्द प्रपंचातून अपेक्षा आहे.

बिनतारी संदेश विभागातील पोलीस अंमलदार पी.एच.व्हावळ यांना 15 दिवसांची प्रत्यार्पित रजा मागली असता त्यांना 15 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली आहेे. रजेचे कारण आर्थिक अडचण असे दाखविण्यात आले आहे. दुसऱ्या महिला पोलीस अंमलदार एच.बी.लोडे यांनी 45 दिवसांची अर्जित रजा मागितली आहे. ती रजा सुध्दा पुर्णपणे 45 दिवसांची देण्यात आली आहे. महिला पोलीस अंमलदार एच.बी.लोडे यांच्या रजेचे कारण गरोदर असल्याने विश्रांतीसाठी रजा घेतली आहे.

पुणे शहरातील बिनतारी संदेश विभागातील पोलीस अंमलदार ए.बी.गावडे यांनी विनापाळीने (अर्थात खंडखंडात नाही) 135 दिवसांच्या अर्जित रजा मागितल्या आणि त्या 135 दिवसांच्या अर्जित रजा विनापाळीनेच मंजुर करण्यात आल्या आहेत. ए.बी.गावडे यांच्या रजेचे कारण सर्वात महत्वपूर्ण आहे. त्यांना नर्मदा नदीची परिक्रमाकरण्यासाठी जायचे आहे. नर्मदा नदीची परिक्रमा खरे तर तिन वर्षांची आहे. त्यातील महत्वाचा भाग म्हणजे 1312 किलो मिटरचा हा मार्ग आहे. उज्जैन, ओंकारेश्र्वर आणि अमरकंटक या मध्यप्रदेशातील गावांपासून ही यात्रा सुरू होते. अमरकंटक हे स्थान नर्मदा नदीचे उगम स्थान आहे. या यात्रेत अनेक रहस्य आणि रोमांच आणि अनेक त्रास सुध्दा असतात. मुळात ही नर्मदा नदीची परिक्रमा यात्रा तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसांत पुर्ण करायची असते. परंतू काही मंडळी हा प्रवास 1312 किलोमिटर पायी चालून 108 दिवसांत सुध्दा पुर्ण करतात. तीन वर्षाचे जी यात्रा आहे त्याचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते वेगवेगळ्या खंडात चालविले जाते. नर्मदा नदीच्या परिक्रमा करण्याच्या प्रक्रियेला मोठे महत्व आहे. नर्मदा नदी उलट्या दिशेने प्रवाह करते. आणि शेवटी बंगाल उपसागरात जाऊन मिळते.

अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी पुण्यातील पोलीस अंमलदार ए.बी.गावडे यांना 135 दिवसांची अर्जित रजा देण्यात आली आहे. इकडे आपल्या मेहुण्याचे लग्न असेल तरी सहा दिवसांची रजा मागितली तर लग्नाच्या दिवशी जा असे अधिकारी सांगतात आणि त्या पोलीस अंमलदाराला दोनच दिवसांची रजा मिळते. हा एक प्रसंग नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनात पाच दिवस, आठ दिवस, पंधरा दिवस, एक महिला अशी रजांची गरज असते. पण ए.बी.गावडेला मिळाली एवढी लांब रजा बहुतेक महाराष्ट्रात पोलीस खात्यात पहिल्यांदाच असेल. मग हा अधिकारी जो पुण्यातीदल पोलीस अंमलदार ए.बी.गावडेला मिळाला तो अधिकार राज्यातील दीड लाखांपेक्षा जास्त पोलीस अंमलदारांना का मिळू नये असे ए.बी.गावडे यांना मिळालेल्या आदेशानंतर वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *