नांदेड(प्रतिनिधी)-देशात एक तारीख एक घंटा हे अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राबवले जाणार आहे. या एका तासादरम्यान स्वच्छतेची मोहिम राबवली जाणार आहे अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी जारी केली आहे. नांदेडमधील स्वच्छता प्रेमी नागरीक, ज्येष्ठ नागरीक, शाळा आणि महाविद्यालय, शिकवणी वर्ग, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, दवाखाने, एनसीसी या सर्वांनी या स्वच्छता अभियानात भाग घ्यावा असे आवाहन डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
दि.1 ऑक्टोबर 2023 रोजी एक तारीख एक घंटा हा स्वच्छता उपक्रम शहरातील 20 जागी राबवला जाणार आहे. स्वच्छता प्रेमी नागरीकांसाठी ह्या 20 जागा, त्या जागेवर होणाऱ्या कामाचे समन्व्यक अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे मोबाईल नंबर आम्ही बातमी सोबत जोडले आहेत. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा जनतेला आवाहन करत आहे की, एक तारीख एक घंटा या स्वच्छता पंधरवाड्यात सहभागी व्हावे. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा हा स्वच्छता पंधरवाडा साजरा होणार आहे.
सोबत यादी जोडली आहे..
