नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागात बदली झालेल्या एका पोलीस अंमलदाराचे पगार पत्रक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील एका लिपीकाला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निलंबित करून सर्वांसाठी एक इशारा दिला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक कार्यालयात सत्यपाल चिंकेवार नावाचे एक लिपीक आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलातून काही पोलीस अंमलदाराच्या बदल्या मागे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे झाल्या. बदली झालेल्या पोलीस अंमलदाराचे पगार पत्रक लाच लुचपत विभागाला पाठवायचे असते. काही जणांच्या पगार पत्रकांची रवानगी सत्यपाल चिंकेवार यांनी लाच लुचपत विभागाकडे केली. मात्र एका पोलीस अंमलदाराचे पगार पत्रक त्यांनी पाठविले नाही म्हणून तो पोलीस अंमलदार वारंवार याचा पाठपुरावा करत होता. त्यावेळी सत्यपाल चिलकेवार यांनी त्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात गेलेल्या पोलीस अंमलदाराकडून लाचेची मागणी केली. काही जण सांगतात. लाचेचा आकडा पाच हजार रुपये होता. पण याला कोठून दुजोरा मिळत नाही.
घडलेला प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अंमलदाराने आपले पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्याकडे व्यथेच्या स्वरुपात मांडले. त्यानंतर राजकुमार शिंदे आणि नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यात काही चर्चा झाली आणि जवळपास आठ दिवसांअगोदर पोलीस अधिक्षक कार्यालयातील लिपीक सत्यपाल चिलकेवार यांना निलंबित करून माझ्या कार्यालयात कोणी अशा प्रकारची गडबड करू नये असा इशारा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अंमलदाराकडून लाच मागणाऱ्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील लिपीकाचे निलंबन