अबु शुटरच्या मांडीवर गोळीमारून पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या एका गुन्हेगाराला पकडतांना त्यांने चाकू घेवून पोलीसांना धमकावल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्या मांडीवर गोळी मारून त्याला पकडले आहे. हा प्रकार भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणा शाळेजवळ घडला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अबु शुटर उर्फ आवेज शेख मेहमुद हा पाहिजे असलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला कॅनॉल रोडजवळ दिसला. पोलीसांनी त्याला थांबण्याची सुचना केली तेंव्हा त्याने आपल्या कंबरेला लावलेला खंजीर काढून पोलीसांना धमकावले. तेंव्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे प्रमुख पांडूरंग माने यांनी अबु शुटरवर गोळी चालवली. ती गोळी त्यांच्या मांडीत लागली. तरी तो तशाही अवस्थेत पळत होता आणि पोलीस पथक त्याचा पाठलाग करत होते. नारायण शाळेजवळ आल्यानंतर मात्र तो अखेर खाली पडला आणि पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि इतर अनेक जण घटनास्थळी पोहचले. सर्व प्रथम जखमी झालेल्या अबु शुटरला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तलिहिपर्यंत या घटनेची इतर कायदेशीर कार्यवाही पुर्ण झाली नव्हती.
अबु शुटरविरुध्द दि.5 मे 2023 रोजी रात्री 9 वाजता आपल्या दुसऱ्या काही साथीदारांसह एका युवकावर जिवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा क्रमांक 329/2023 नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रलंबित आहे. याशिवायही इतवारा भागात सुध्दा असेच काही गंभीर गुन्हे नोंद आहे. अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यात एका पोलीसाला मारहाण करून अबु शुटर पळून आलेला आहे. कर्नाटक राज्यात सुध्दा अबु शुटरविरुध्द गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *