नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आरोपी आशिष सपुरे आणि रबज्योतसिंघ उर्फ गब्या तिवाना या दोघांची माहिती जनतेने द्यावी त्यामुळे त्यांना पकडणे शक्य होईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून दोघांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी 25-25 हजार रुपये रोख रक्कम बक्षीस सुध्दा देवू असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जाहीर केले.
नांदेड जिल्ह्यात व शहरात अनेक गुन्हे करून फरार झालेले आरोपी आशिष सपुरे आणि गब्या या दोघांच्या नावावर असलेली संपत्ती फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 82 आणि 83 प्रमाणे जप्त करता येते. तशी कार्यवाही करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासोबतच पोलीस अधिक्षकांनी जनतेला आवाहन केले आहे की, या दोघांची माहिती द्या माहिती देणाऱ्याला प्रत्येकी 25-25 हजार रुपये रोख बक्षीस दिले जाईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जनतेला केेले आहे.
व्हिडीओ….
गब्या आणि आशिषची माहिती द्या 25-25 हजार रुपये मिळवा-पोलीस अधिक्षक कोकाटे