आरक्षण हक्क संवर्धन समितीच्यावतीने चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच

नांदेड(प्रतिनिधी)-आरक्षण हक्क संवर्धन समितीच्यावतीने गांधी जयंतीपासून सुरू असलेले आमरण उपोषण आजही सुरू आहे.उपोषणकर्त्यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे.
महात्मा गांधी जयंतीदिनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर शितल भवरे, कावेरी ढगे, विनोद वाघमारे या तिघांनी आमरण उपोषणाची सुरूवात केली आहे. त्यांच्या मागण्याप्रमाणे कंत्राटी नोकर भर्ती शासन निर्णय रद्द व्हावा, ओबीसी आरक्षणात घटनात्मक संरक्षण द्यावे, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ व्हावी व दरमहा शिष्यवृती मिळावी. दत्तक शाळा योजना हे 18 सप्टेंबर 2023 चे परिपत्रक रद्द करावे, खोटे जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांविरुध्द कार्यवाही व्हावी या मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण आज 5 ऑक्टोबर 2023 रोजी सुध्दा सुरू होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी सुचवले होते. परंतू उपोषणकर्त्यांनी त्यास नका दिला आहे.उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली तरी विविध 33 संघटनांनी त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *