जनतेने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये-पोलीस विभाग
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर वाहतुक शाखा क्रमांक 1 ने एका दुचाकीवर तीन जण प्रवास करणाऱ्या वाहनांवर 154 खटले दाखल करून त् यांच्याकडून 1 लाख 54 हजार दंड वसुल केला आहे. पोलीसांनी आवाहन केले आहे की, पालकांनी आपल्या 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या पाल्यांना दुचाकी गाड्या चालविण्यास देवू नये.
शहर वाहतुक शाखा क्रमांक 1 वजिराबाद येथील पोलीस निरिक्षकांनी जारी केलेल्या माहितीनुसार एक विशेष मोहिम राबवून त्यात खास करून एका दुचाकीवर तीन स्वार प्रवास करत आहेत अशा गाड्यांवर लक्ष ठेवण्यात आले आणि अशा 154 गाड्यांविरुध्द खटले दाखल केले.ट्रिपल सिट वाहतुक करणाऱ्या लोकांकडून 1 लाख 5ं4 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला .
या मोहिमेसोबत पोलीस विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये, ट्रिपलसिट वाहन चालवू नये, नो पार्किंगमध्ये वाहने उभे करून वाहतुकीस अडथळे निर्माण करू नये, पालकांनी आपल्या 18 पेक्षा कमी वयाच्या पाल्यांना दुचाकी गाडी चालविण्यास देवू नये.
ट्रिपलसीट चालकांकडून 1 लाख 54 हजार रुपये दंड वसुल