नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेने 30 वर्षीय युवकाची गच्ची पकडून त्याला जोरात ढकलून दिल्याने तो खाली पडला आणि मरण पावल्याचा प्रकार सांगवी भागातील गौतमनगर येथे घडला आहे.
ज्योती गणेश कांबळे या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 2 ऑक्टोबरच्या सकाळी 9.30 ते 10.30 दरम्यान गौतमनगर सांगवी येथे किराणा दुकानासमोर ललिताबाईचा मुलगा राजेश यास माझा पती गणेश मारोती कांबळे (30) हा पैसे मागणी करत असतांना त्यांच्याच शेजारी राहणारी महिला आमरिन उर्फ आम्रापाली तेथे आली आणि माझा पती गणेश कांबळे यास तुझी काय औकात आहे, पैसे मागतोस काय असे म्हणून माझ्या पतीची गच्ची पकडली आणि ओढून त्याला जोरात ढकलून दिले. खाली पडून ते मरण पावले आहेत. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी घटनास्थळी भेट दिली आणि योग्य सुचना दिल्या. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी भारती दंड संहितेच्या कलम 304 नुसार गुन्हा क्रमांक 324/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप गोंड यांच्याकडे देण्यात आला आहे.
एका महिलेने ढकलून दिल्याने 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; गुन्हा दाखल