नांदेड जिल्ह्यात टी.व्ही.9 चा एकटाच प्रतिनिधी राजू गिरी असेल तर तालुक्यात कार्यालय कसे?

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्ह मागील बातम्यांवर नाराज असणाऱ्या पोलीस निरिक्षकाने वास्तव न्युज लाईव्हचे संपादक यांच्याविरुध्द नवीन गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तक्रारीमध्ये राजू गिरीने मी एकटाच नांदेड जिल्ह्यात प्रतिनिधी आहे असे लिहिलेले आहे. ज्या तालुक्यात आम्हाला प्राप्त झालेला स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ आहे त्याच गावात टी.व्ही.9 चे ऑफिस कसे आहे मग? ते ऑफीस खोटे असेल तर त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही. राजू गिरीला पत्रकारीता करता-करता अजून कायदाच कळाला नाही काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
ज्या माहितगाराने आम्हाला माहिती दिली, व्हिडीओ दिला तो तर कोणत्याही क्षणी कोठेही येवून तो व्हिडीओ सत्य असल्याचे व मी स्वत:च रेकॉर्ड केल्याचे सांगायला तयार आहे. परंतू माहितगाराचे नाव सांगायचे नसते हे राजू गिरी विसरला असेल पण आम्ही विसरलो नाही. आम्हाला प्राप्त झालेल्या त्या टी.व्ही.9 च्या कार्यालयाच्या अजून भरपूर काही लिहिलेले आहे तो भाग क्रॉप करून आम्ही फक्त टी.व्ही.9 चा लोगो या बातमीत छापत आहोत. व्हिडीओमध्ये पैसे घेणारा व्यक्ती त्याच टी.व्ही.9 कार्यालयाचाच आहे. म्हणून त्याने स्वत:च्या व्यक्तीगत ऑफीसवर टी.व्ही.9 चा लोगो लावलेला आहे. मग तो खोटा प्रचार आम्ही केला काय? राजू गिरीने आपल्या पूर्ण पत्रकारीतेच्या कालखंडात एकाही क्षणी स.आदत हसन मंटोचे वाक्य कधीच खोटे ठरवलेले नाही असो. पोलीसांनी तपास करतांना राजू गिरीची तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले तर त्याच्याविरुध्द सुध्दा कायदेशीर कार्यवाही करण्याची मुभा फौजदारी प्रक्रिया संहितेत नमुद आहे.त्याची तक्रार न्यायालयाला द्यावी लागते. मग कसे होईल?
व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती दिसतात मग वास्तव न्युज लाईव्हचा संपादक आरोपी कसा होतो. त्या तीन पैकी एकाला तर राजू गिरी ओळखतोच कारण त्याचा अर्धवट चेहरा त्यात दिसतो आहे आणि राजू गिरी त्या अर्धवट चेहऱ्याला ओळखत नाही हे तर सौ चुहे…… असेच होणार आहे. राजू गिरी हे लक्षात ठेवा आम्ही काल चुकीने आमच्या जातीचा उल्लेख केलेला आहे. परंतू आम्ही लेकर मात्र छत्रपती शिवाजी महाराज-फुले-शाहु आंबेडकरांचीच आहोत त्यांनी आम्हाला न्यायासाठी लढणे शिकवले आहे. जातीवर नाही हे पण जाणून घ्या. तुम्ही टी.व्ही.9 कोणाच्या हातातून कोणत्या पध्दतीने हिसकावून घेतला होतात आणि तुला तो कोणी मिळवून दिला होता याचा ईतिहास पण आता माहित झाला आहे. तो लिहायची पाळी आणू नका.सकाळी 8 वाजता कोठे जेवायला मिळत होते हा ईतिहास पण आम्हाला आता माहित झाला आहे तो लिहावा काय? राजू गिरी आपण फोन पे वर पैसे घेतल्याच्या पावत्या सुध्दा प्राप्त झाल्या आहेत ते आम्ही आमच्या सवडीनुसार प्रकाशित करणारच आहोत.
पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम करतांना आम्ही काही चुकलो असेल, पत्रकारीतेच्या नियमांना फाटा दिला असेल तर तुम्ही सुध्दा टी.व्ही.9 मध्ये आमच्या बाईटसह बातमी छापायची तयारी ठेवा. पाहुया जिवन आहे कभी कोई आगे-कभी कोई पिछे मगर जित तो सत्य की ही हमेशा होती है।

संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/10/10/आपले-पितळ-उघडे-होताच-वास्/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *